लैंगिक छळाच्या आरोपाने लोकप्रियतेला धक्का -

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 03:30 IST2016-01-16T01:15:37+5:302016-02-13T03:30:44+5:30

24 वर्षांच्या या गायकावर 8 मे 2014 रोजी बलात्काराचा आरोप लावण्यात आला होता. 

Pushing for popular sexual assault | लैंगिक छळाच्या आरोपाने लोकप्रियतेला धक्का -

लैंगिक छळाच्या आरोपाने लोकप्रियतेला धक्का -

 24
वर्षांच्या या गायकावर 8 मे 2014 रोजी बलात्काराचा आरोप लावण्यात आला होता. 28 वर्षीय जाहिरात व्यवस्थापिकेने हा आरोप केला. 2013 पासून अनेक वेळा बलात्कार झाल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटले होते. बलात्काराच्या आरोपाखाली पुढे अंकित तिवारीला अटकही करण्यात आली होती.
इंद्र कुमार : 'ब्रदर' या चित्रपटात सलमान खानच्या भावाची भूमिका करणार्‍या इंद्रकुमार या अभिनेत्यावर एका 23 वर्षीय मॉडेलने बलात्काराचा आरोप के ला होता. चित्रपटात भूमिका मिळवून देण्याचे आश्‍वासन दिल्यावर त्याने हे कृत्य केले, शिवाय याची वाच्यता न करण्याची धमकी दिली. दोन दिवस वर्सोवा येथील फ्लॅटमध्ये डांबून ठेवल्याची तक्रार तिने के ली होती.
सुभाष कपूर : जॉनी एलएलबीचा दिग्दर्शक सुभाष कपूर याच्यावर अभिनेत्री गीतिका त्यागी हिने बलात्कार केल्याची कुबली देणारी एक क्लिपच सोशल मीडियावर शेअर होती. सुभाष कपूरची पत्नी डिंपल हिने मला असे करू नये यासाठी याचना केल्याने पोलिसांत तक्रार केली नाही असे ती या व्हिडिओत सांगताना दिसते. मात्र नंतर हाच व्हिडिओ पुरावा मानून पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली होती.
दिबांकर बॅनर्जी : खोसला का घोसला, लव्ह, सेक्स और धोका सारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक दिबांकर बॅनर्जीवर त्याची मैत्रिण व अभिनेत्री पायल रोहतगी हिने विनयभंगाचा आरोप केला होता. एका रात्री दिबांकरने हे कृत्य व मी याला विरोध केल्याने अभिनयाच्या बाबतीत पॉझिटिव्ह फिडबॅक असतानाही मला शंघाईमध्ये संधी दिली नाही, असे तिने आपल्या अभिजित भट्टाचार्य : मुंबईत दुर्गापूजे दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे अभिजित चर्चेत आला आहे. एका 34 वर्षीय महिलेने त्याच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली. उशीरा का होईना पण त्याचाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. 'या विषयी मला काहीच कल्पना नाही. तेथे खूप गर्दी होती, व्यवस्थापन चांगले नव्हतेच. पोलिसांनी व सुरक्षारक्षकांनी आपले काम केले. 
बॉलिवूड सेलिब्रिटींवर जीव ओवाळून टाकणारे अनेक प्रेक्षक असतात. मात्र कधी कधी हे स्टार्स किंवा सेलिब्रिटी असे काम करतात की त्यांच्या याच लोकप्रियतेला प्रचंड धक्का बसतो व त्यांना टीकेला सामोरे जावे लागते.

Web Title: Pushing for popular sexual assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.