प्रियांका चोप्रा मिस वर्ल्ड झाली अन तिने या मायावी नगरीत आपले नशीब आजमाविण्यासाठी पाऊल टाकले. प्रियांकाने बॉलीवुडमध्ये सशक्त भुमिका साकारल्यानंतर नेक्स इ
प्राउड मोमेंट फॉर प्रियांका...
/> प्रियांका चोप्रा मिस वर्ल्ड झाली अन तिने या मायावी नगरीत आपले नशीब आजमाविण्यासाठी पाऊल टाकले. प्रियांकाने बॉलीवुडमध्ये सशक्त भुमिका साकारल्यानंतर नेक्स इनिंगसाठी ती हॉलीवुडकडे वळली अन तिच्या फॅन्ससाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी व प्राऊड मोमेंट होती. प्रियांकाने हॉलीवुडमध्येही स्वत:चे अस्तित्व निर्माण केले असुन जगातील सर्वोत्कृष्ठ समजल्या जाणाºया आॅस्कर पुरस्कार सोहळ््यात ती लीबानीझ डिझायनर झुएर मुरुड यांनी डिझाईन केलेला व्हाईट गाऊन परिधान करुन ग्लॅमरस लुकमध्ये तिचा जलवा दाखवित आहे. एवढेच नाही तर बेस्ट एडिटींग अॅवॉर्ड देण्यासाठी तिने आॅस्करचा स्टेज लीव शेरिबर यांच्यासमवेत शेअर केला. नॉमिनिज वाचुन दाखविल्यानंतर तिने विनरचे नाव अनाउन्स केले. मार्गारेट सिक्सेल यांना हा पुरस्कार प्रियांकाच्या हातुन देण्यात आला. मार्गारेट यांच्या सोबत प्रियांकाने नंतर चॅटिंग केले. आॅस्करमधील प्रियांकाच्या या प्रझेन्समुळे तिचे फॅन्स नक्कीच म्हणतील प्रियांका वी प्राउड आॅफ यु......