पाक कलावंतांना विरोध नित्याचाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 05:55 IST2016-01-16T01:18:49+5:302016-02-07T05:55:47+5:30

 गुलाम अली यांच्या आधीदेखील अनेक कलाकारांना अशा प्रकारच्या विरोधाला सामोरे 

The protesters are opposed to the protesters | पाक कलावंतांना विरोध नित्याचाच

पाक कलावंतांना विरोध नित्याचाच

 
ुलाम अली यांच्या आधीदेखील अनेक कलाकारांना अशा प्रकारच्या विरोधाला सामोरे जावे लागले आहे. नुकतीच पाकिस्तानी अभिनेत्री माहिराचा चित्रपट बिन रोए याला महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ दिले नाही. आता माहिरा पुढील वर्षी येणार्‍या शाहरुख खानचा चित्रपट रईसमध्ये त्याची अभिनेत्री म्हणून दिसणार आहे. आता हे पाहावे लागेल की, रईसबाबत शिवसेना आणि मनसेचा काय पावित्रा राहतो.याआधी पाकिस्तानातूनआलेला कॉमेडियन शकीलला देखील परत जावे लागले आहे. शकीलला तर चित्रीकरणादरम्यानच तीव्र विरोधामुळे सेट सोडावा लागला आणि मुंबईदेखील. कॉमेडी शोमध्ये शकीलशिवाय रऊफ लाला आणि अनेक दुसरे पाकिस्तानी कलाकार आले, मात्र विरोधामुळे त्यांनाही परत जावे लागले. पाकिस्तान येथून आलेली व बिग बॉस अतिथी बनलेली विना मलिक हिलाही भारतातून परतावे लागले, तर मीरालादेखील अशाच विरोधाचा सामना करावा लागला. मीराला महेश भट्ट यांनी हिंदी चित्रपटात आणले होते. तिच्यासोबत नजर चित्रपट बनविल्यानंतर भट्ट तिला पुन्हा घेऊ इच्छित होते मात्र, विरोधामुळे महेश भट्ट यांना आपला विचार बदलवावा लागला. आपल्या कव्वालिसाठी जगभरात नाव कमविलेले नुसरत फतह अली खान यांचे पुत्र राहत अली खान यांच्या गायनास भारताच्या संगीतप्रेमींनी खूप पसंत केले, मात्र येथे होणार्‍या विरोधामुळे त्यांचे येणेही जवळजवळ बंद झाले आहे. राहत फतह अली खान सध्या दुबईत जाऊन बॉलिवूडच्या चित्रपटांसाठी गाण्यांचे रेकॉर्डिंग करीत असता. पाकिस्तानचे आणखी एक गायक अतिफ असलम यांनादेखील विरोधामुळे भारतात येण्याचा विचार बदलावा लागला. पाकिस्तानातून आलेल्या सर्व कलाकांरासोबत असेच असे झाले आहे. अली जाफर सलग बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम करीत आहे आणि त्याच्या कोणत्याही चित्रपटाच्या प्रदर्शनाला काहीही अडचण आली नाही. खूबसूरत चित्रपटात सोनम कपूरचा नायक बनलेल्या फवाहद खानला देखील अशा समस्येचा सामना करावा लागलेला नाही. तो अजूनही बॉलिवूडच्या तीन चित्रपटांमध्ये काम करीत आहे.आणखी एक पाकिस्तानी कलाकार इमरान अब्बास विक्रम भट्टचा चित्रपट क्रिचरमध्ये दिसला होता. सध्या तो करण जाैहरचा नवीन चित्रपट ए दिल है मुश्किल मध्ये काम करीत आहे.नुकताच सलमान खानचा चित्रपट बजरंगी भाईजानमध्ये भर दे झोली. गाणारे अदनान सामी अनेक वर्षांपासून मुंबईत राहत आहेत आणि त्यांना कोणतीच अडचण आली नाही. गझल गायक गुलाम अली यांचा मुंबई येथे होणारा गझल गायनाचा कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधामुळे अखेर रद्द झाला आहे. परंतु असे पहिल्यांदाच झालेले नाही. गुलाम अली यांचा हा चौथा कार्यक्रम आहे, ज्याला शिवसेनाच्या विरोधामुळे रद्द करण्यात आले. पाकिस्तानकडून भारतात दहशतवाद पसरविला जात असल्यामुळे शिवसेना अनेक वर्षांपासून पाकिस्तानी कलाकारांना येथे चित्रपट आणि टीवी शोमध्ये काम करण्यास विरोध करीत आली आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील अशा प्रकारच्या विरोधासाठी अनेकदा पुढाकार घेतला आहे. 

Web Title: The protesters are opposed to the protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.