मादी फुलपाखरांचा बचाव अधिक दमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:03 IST2016-01-16T01:14:53+5:302016-02-07T13:03:52+5:30

रंगबिरंगी फुलपाखरांना पाहून कोणाचेही मन मोहून जाते.

Protecting the female flowerpuckle is more powerful | मादी फुलपाखरांचा बचाव अधिक दमदार

मादी फुलपाखरांचा बचाव अधिक दमदार

गबिरंगी फुलपाखरांना पाहून कोणाचेही मन मोहून जाते. पण त्यांची हीच सुंदरता शिकार्‍यांना त्यांच्याकडे आकर्षित करते. त्यामुळे त्यांच्या जीवाला नेहमीच धोका असतो.

हे जरी खरे असले तरी निसर्गाने सर्वांना बचावाची शक्ती दिली आहे. तशी ती फुलपाखरांमध्येसुद्धा आहे.

'एव्होल्युशन' र्जनलमध्ये ऑनलाईन प्रकाशित झालेल्य एका संशोधनातून असे दिसून आले की, नरापेक्षा मादी फुलपाखरांचा बचाव अधिक दमदार असतो. भक्ष्य आणि शिकारी यांच्या परस्पर संबंधाचा विषयी बेंगळूरुच्या 'नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स' आणि 'नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर'तर्फे हे संशोधन करण्यात आले.

शिकार्‍यापासून बचाव करण्यासाठी फुलपाखरे रंग बदलून असे भासवतात की ते विषारी आणि अपायकारक आहेत. याला 'अँपोसेमॅटिक कलरेशन' म्हणतात. मादा फुलपाखरे अशा 'अँपोसेमॅटिक कलरेशन'मध्ये नरांपेक्षा अधिक प्रभावी असतात. याचे कारण की, मादांसोबत अंडी असतात. त्यामुळे त्यांना जलद उडता येत नाही. रंग बदलने हाच त्यांचा सवरेत्तम बचाव असतो व तो त्यांना निसर्गत: लाभलेला असतो.

Web Title: Protecting the female flowerpuckle is more powerful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.