40 दिवसांत प्रियंका 100 कोटी कमावणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 17:08 IST2016-05-25T11:27:30+5:302016-05-25T17:08:22+5:30

अभिनेत्री प्रियंका चोप्राने हॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर तिचा भाव चांगलाच वधारला आहे.

Priyanka will earn Rs 100 crore in 40 days! | 40 दिवसांत प्रियंका 100 कोटी कमावणार!

40 दिवसांत प्रियंका 100 कोटी कमावणार!

 अभिनेत्री प्रियंका चोप्राने हॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर तिचा भाव चांगलाच वधारला आहे. क्वॉन्टिको स्टार प्रियंका काही काळासाठी मायदेशी परतणार आहे. मात्र हा दौरा आरामासाठी नसून पुढील 40 दिवसांत ती एक-दोन नव्हे तर तब्बल 100 कोटी रुपये कमावणार असल्याची माहिती आहे.

 
100 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये जाणारे चित्रपट बॉलिवूडसाठी नवीन नाहीत. मात्र प्रियंका 100 कोटी कमावणारी पहिली सेलिब्रेटी ठरु शकते. प्रियंकाने 24 अॅड कॅम्पेन साईन केल्या असून दीड महिन्यात ती 100 कोटी कमवू शकते.

 
या ब्रँड्समध्ये एक फ्रूट बेव्हरेज कंपनी, गोल्ड ज्वेलरी हाऊस, एअरलाईन, पान मसाला कंपनी आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी पोर्टल यांचा समावेश आहे. त्यापैकी एकटी फ्रूट बेव्हरेज कंपनी जाहिरातीसाठी 6 कोटी रुपये मोजणार आहे.

Web Title: Priyanka will earn Rs 100 crore in 40 days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.