'बे-वॉच'मध्ये दिसणार प्रियंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2016 16:12 IST2016-01-16T01:05:27+5:302016-01-24T16:12:50+5:30

'बे-वॉच'मध्ये दिसणार प्रियंका क्वांटिको मालिकेतून अमेरिकन टीव्ही स्टार झालेली प्रियंका चोप्रा ह...

Priyanka to appear in 'BayWatch' | 'बे-वॉच'मध्ये दिसणार प्रियंका

'बे-वॉच'मध्ये दिसणार प्रियंका

वांटिको मालिकेतून अमेरिकन टीव्ही स्टार झालेली प्रियंका चोप्रा हीच्यासाठी हे नवीन वर्षही खास ठरेल, असेच संकेत मिळत आहेत. तिला अमेरिक न टीव्ही सपुरस्टार ड्वायन जॉन्सन आणि झ्ॉक इफ्रॉन यांच्यासोबत 'बे वॉच' या चित्रपटामधून हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळणार असल्याचे वृत्त आहे.
या चित्रपटाच्या भूमिकेसाठी बोलणी सुरू आहे. 'क्वान्टिको' मालिकेमुळे अमेरिकेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात प्रियंकाला यश मिळाले आहे. अलिकडेच तिला या मालिकेसाठी अमेरिकेतील प्रतिष्ठीत 'पीपल्स चॉईस अवॉर्ड' मिळाला.
'बे वॉच' ही 1990 पासून टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ठरली होती. कॅलिफोर्नियाच्या समुद्रावर लोकांना वाचवण्याची जबाबदारी पार पाडणार्‍या लाईफ गार्डच्या जीवनावर आधारित ही मालिका आहे.
'बे वॉच' चित्रपटाचे शूटिंग आणि 'क्वॉन्टिको'च्या शूटिंगच्या तारखांचा मेळ साधण्याचा प्रयत्न केला जातोय. पण हे शक्य झाले तर प्रियंका यात खलनायिकेची भूमिका साकारेल, हे जवळ-जवळ नक्की झालेय.

Web Title: Priyanka to appear in 'BayWatch'