प्रिया दत्त म्हणाल्या,पडद्यावर भावाचा जीवनपट पाहणे रोमांचक असेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 05:19 IST2016-02-28T12:19:36+5:302016-02-28T05:19:36+5:30

भाऊ संजय दत्त तुरुंगातून परतल्यानंतर प्रिया दत्त त्याच्याबद्दल भरभरून बोलताना दिसत आहेत.

Priya Dutt said, it would be exciting to watch the screenplay on the screen | प्रिया दत्त म्हणाल्या,पडद्यावर भावाचा जीवनपट पाहणे रोमांचक असेल

प्रिया दत्त म्हणाल्या,पडद्यावर भावाचा जीवनपट पाहणे रोमांचक असेल

ऊ संजय दत्त तुरुंगातून परतल्यानंतर प्रिया दत्त त्याच्याबद्दल भरभरून बोलताना दिसत आहेत.  माझ्या भावाच्या आयुष्यावर बेतलेला सिनेना प्रेक्षकांना निश्चितपणे आवडेल. माझ्यासाठीही हा रोमांचक अनुभव असेल, असे प्रिया म्हणाल्या.
 या आगामी चित्रपटात अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यातील घटनांवर प्रकाश टाकला जाईल. त्यांचे प्रेमसंबंध, मादक पदार्थांचे व्यसन, अंडरवर्ल्डशी संपर्क आणि त्यांचा तुरुंगवास असा सगळा प्रवास  यात दिसेल. प्रिया दत्त आपल्या भावाच्या आयुष्यावरील चित्रपटाबद्दल उत्सूक आहेत. संजयचे आयुष्यात अनेक चढउतार पाहिलेत. पण संजय प्रत्येक संकटाला तितक्याच संयमीपणे सामोरा गेला. संजयने आपल्या बॉलिवूड करिअरमध्ये अनेक चित्रपट केले. मात्र ‘वास्तव’ व ‘मुन्नाभाई’ श्रृंखलेलील चित्रपट मला सर्वाधिक आवडलेले चित्रपट आहेत, असेही त्यांनी सांगितले

Web Title: Priya Dutt said, it would be exciting to watch the screenplay on the screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.