इंग्लंडचा राजपुत्र गे मॅगझीनवर झळकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 20:09 IST2016-06-15T14:39:21+5:302016-06-15T20:09:21+5:30

इंग्लंडच प्रिन्स विल्यम ‘अ‍ॅटिट्यूड’ या गे मॅगझीनच्या मुखपृष्ठावर झळकला आहे.

Prince of England appeared on Gay Magazine | इंग्लंडचा राजपुत्र गे मॅगझीनवर झळकला

इंग्लंडचा राजपुत्र गे मॅगझीनवर झळकला

ग्लंडच प्रिन्स विल्यम ‘अ‍ॅटिट्यूड’ या  गे मॅगझीनच्या मुखपृष्ठावर झळकला आहे.

समलैंगिकांना दिल्या जाणाऱ्या वाईट व हिंसक वागणूकीच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले आहे.

अशा प्रकारे समलैंगिक मॅगझीनवर झळकणारा तो ब्रिटिश राजघराण्यातील पहिलाच व्यक्ती ठरला आहे.

केवळ लैंगिकतेच्या आधारावर आपण माणसा-माणसांमध्ये भेदभाव करू नाही शकत. अशा प्रकारचा अन्याय तुमच्यावर होत असेल त्याबाबत दाद मागण्यात मागे राहू नका. मोकळेपणाने समोर या असा त्यांनी संदेश दिला.

नुकतेच अमेरिकेतील ओरलँड येथील ‘पल्स’ या गे क्लबमध्ये एका माथेफिरूने केलेल्या गोळीबारात ४९ जणांचा मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली अर्पित करणाऱ्या पुस्तकाचे विमोचन करताना त्यांनी मॅगझीनचे हे कव्हर प्रदर्शित केले.

Prince William

Web Title: Prince of England appeared on Gay Magazine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.