​‘लौट आओ गौरी’ निमित्ताने प्रथमेशचे हिंदी रंगमंचावर पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 16:26 IST2016-06-10T10:56:33+5:302016-06-10T16:26:33+5:30

या जगात पैशाला किती अनन्य साधारण महत्त्व आहे, हे आपल्याला जीवन जगताना कळतच असते. त्यातच पैशांबरोबरच सत्ता असली तर कोणत्याही गोष्टीला महत्त्व प्राप्त होते हे सांगणे चुकीचे ठरणार नाही.

Prathamesh debuts on the Hindi Theater on the occasion of "Lot Ao Gauri" | ​‘लौट आओ गौरी’ निमित्ताने प्रथमेशचे हिंदी रंगमंचावर पदार्पण

​‘लौट आओ गौरी’ निमित्ताने प्रथमेशचे हिंदी रंगमंचावर पदार्पण

जगात पैशाला किती अनन्य साधारण महत्त्व आहे, हे आपल्याला जीवन जगताना कळतच असते. त्यातच पैशांबरोबरच सत्ता असली तर कोणत्याही गोष्टीला महत्त्व प्राप्त होते हे सांगणे चुकीचे ठरणार नाही. 

याच विषयावर प्रकाशझोत टाकून म.ल. डहाणूकर महाविद्यालय प्रस्तुत ‘लौट आओ गौरी’ हे नाटक रंगभूमीवर नुकतेच आले आहे. जियालाल या दु:खी आणि हतबल बापाची भूमिका साकारली आहे तरुणाईच्या गळ्याचा ताईत झालेला टाईमपास फेम दगडूने म्हणजेच प्रथमेश परब याने.

हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत नाव कमावल्यानंतर आणि मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाची जादू पसरवल्यानंतर ‘लौट आओ गौरी’ या हिंदी नाटकाच्या निमित्ताने प्रथमेशने हिंदी रंगमंचावर पदार्पण केले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या नाटकात प्रथमेशसह विभव राजाध्यक्ष, वेदांगी कुलकर्णी, सुव्रतो प्रभाकर सिंह, सिद्धेश पुजारे, तेजस्विनी कासारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘लौट आओ गौरी’चे  लेखक पराग ओझा असून पराग, कृणाल, सुशील या त्रयीने याचे दिग्दर्शन केले आहे. तर नेपथ्य हर्षद-विशाल, प्रकाशयोजना जयदीप आपटे, संगीत समीहन यांनी सांभाळले आहे.

Web Title: Prathamesh debuts on the Hindi Theater on the occasion of "Lot Ao Gauri"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.