​प्राची देसाई करणार पुण्यात सेंद्रीय शेती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 20:50 IST2016-06-04T15:20:42+5:302016-06-04T20:50:42+5:30

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राची देसाईने ‘अझर’मध्ये उत्तम भूमिका साकारून कौतुकास पात्र ठरली आहे.

Prachi Desai will do organic farming in Pune | ​प्राची देसाई करणार पुण्यात सेंद्रीय शेती

​प्राची देसाई करणार पुण्यात सेंद्रीय शेती

लिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राची देसाईने ‘अझर’मध्ये उत्तम भूमिका साकारून कौतुकास पात्र ठरली आहे. प्राचीबाबत अजून विशेष सांगायचे म्हटले म्हणजे या हरहुन्नरी अभिनेत्रीला अभिनयाव्यतिरिक्त शेतीचीही आवड असल्याचे समजते.  प्राचीने तिच्या फार्म हाऊसवर सेंद्रिय शेती करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

पुण्याजवळ देसाई कुटुंबाचा एक प्लॉट आहे. या जागेवर भाज्यांची शेती करण्याची सर्व जबाबदारी प्राचीने उचलली आहे. विशेष म्हणजे सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे प्राचीचा भर असणार आहे.

आरोग्यदायी लाईफस्टाईलकडे प्राची देसाईचा ओढा असल्यामुळे स्वत:च सेंद्रिय शेती करुन योग्य तो आहार घेण्याकडे तिचा कल आहे. विशेष म्हणजे शेतीसाठी नोकर ठेवण्याऐवजी स्वत:च इत्यंभूत माहिती घेऊन शेती करण्याची तिची इच्छा आहे.

प्राची सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी, मातींचे गुणधर्म, कुठल्या भाज्या किंवा फळं कोणत्या हवामानात घ्यावात अशी सर्व माहिती ती तज्ज्ञांकडून घेत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात प्राचीच्या हाती नांगर दिसल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका.

प्राचीने २००६ मध्ये झी टीव्हीवरील सुप्रसिद्ध कसम से मालिकेतून टीव्ही पदार्पण केलं. त्यानंतर झलक दिखला जा मध्येही ती झळकली होती. २००८ मध्ये तिने रॉक आॅन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.  तिचे वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, बोलबच्चन, एक व्हिलन, अझर यासारखे चित्रपट गाजले होते.

Web Title: Prachi Desai will do organic farming in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.