अतिस्मार्टफोन वापरामुळे तिरळेपणा येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2016 18:17 IST2016-04-23T12:47:30+5:302016-04-23T18:17:30+5:30

 स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे पाच वर्षांच्या खालील मुलांमध्ये तिरळेपणाची समस्या उद्भवू शकते.

The possibility of excessive use of smartphones is likely to cause superficiality | अतिस्मार्टफोन वापरामुळे तिरळेपणा येण्याची शक्यता

अतिस्मार्टफोन वापरामुळे तिरळेपणा येण्याची शक्यता

मार्टफोन आणि आपण आता वेगळे होऊ शकत नाही. बोलण्यापासून सर्व आॅफिस वर्क मोबाईलवर केले जाऊ शकते. त्यामुळे दिवसाचा अधिक ाधिका काळ हा स्मार्टफोन हाताळण्यातच जातो. यापासून लहानमुलंदेखील अलिप्त राहू शकलेली नाहीत.

लहान मुलं सर्रास फोन हाताळताना दिसतात. पालकदेखील आपला मुलगा किती हुशार आहे, म्हणून त्याचे कौतुक करत असतात. मात्र, द. कोरियाच्या डॉक्टरांनी असे न करण्याचा सल्ला दिला आहे. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे पाच वर्षांच्या खालील मुलांमध्ये तिरळेपणाची समस्या उद्भवू शकते.

सेऊलच्या ‘चोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटल’च्या डॉक्टरांनी केलेल्या संशोधनात असे दिसून आले की, जास्त काळ स्मार्टफोन वापरणे लहान मुलांच्या डोळ्यांसाठी घातक ठरू शकते. त्यांना तिरळेपणा येऊ शकतो. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलं डोळ्यांपासून 8 ते 12 इंच अंतरावर स्मार्टफोन धरतात. त्यामुळे डोळयांवर अनिष्ट परिणाम होतो.

यावर यशस्वी इलाज करण्यासाठी मुलांना दोन महिने स्मार्टफोनपासून दूर ठेवावे. कारण असे केले असता 12 पैकी 9 जाणांवर उपचार करण्यात यश आले आहे. लगातार 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ स्मार्टफोनच्या स्क्रीनकडे न पाहण्याचा संशोधक सल्ला देतात. मुलांच्या डोळ्यांमध्ये अशी समस्या लक्षात आल्यास, त्वरित डॉक्टरांना दाखवावे.

Web Title: The possibility of excessive use of smartphones is likely to cause superficiality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.