पोर्न पाहणारेही असतात स्त्रीवादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 05:10 IST2016-03-08T09:07:12+5:302016-03-08T05:10:44+5:30

नव्या अध्ययनानुसार पोर्न पाहणारे लोक उलट महिलांना समान मानतात, त्यांना समान वागणूक देतात.

Porn viewers are also feminists | पोर्न पाहणारेही असतात स्त्रीवादी

पोर्न पाहणारेही असतात स्त्रीवादी

टरनेट, स्मार्टफोनच्या युगात पोर्न पाहणाऱ्यांची संख्या कमालीची वाढलेली आहे. पोर्न पाहिल्यामुळे महिलांकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून पाहण्याची वृत्ती वाढते, असे मानणारा एक प्रवाह आहे.

मात्र, नव्या अध्ययनानुसार पोर्न पाहणारे लोक उलट महिलांना समान मानतात, त्यांना समान वागणूक देतात.

वेस्टर्न आॅन्टेरिओ विद्यापीठातील संशोधकांनी यासंबंधी अध्ययन केले. सुमारे २८ हजार लोकांनी भाग घेतलेल्या जनरल सोशल सर्व्हेमधून गोळा झालेल्या डेटाचे विश्लेषन करून त्यांनी हा निष्कर्ष काढला.

सर्वेक्षणात लोकांना त्या पोर्न पाहण्यासंबंधी, महिलांप्रती वाटणाºया भावनांविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. ‘जर्नल आॅफ सेक्स रिसर्च’मध्ये प्रकाशित लेखात म्हटले आहे की, पोर्न पाहणारे लोकही तितकेच स्त्रीवादी असू शकतात, जेवढे पोर्नला विरोध करणारे असतात.

porn watching

२३ टक्के लोकांनी मान्य केले की ते पोर्न पाहतात आणि महिलांना ते समान मानतात. घराबाहेर पडून नोकरी करण्यासाठीसुद्धा ते सकारात्मक होते. संशोधक म्हणतात की, याचा अर्थ असा नाही की पोर्न पाहावे. पण पोर्न पाहिल्याने महिलांप्रती दृष्टीाकोण कलूषित होत नाही, एवढे मात्र खरे!

Web Title: Porn viewers are also feminists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.