पॉर्न इंडस्ट्री : एक वेगळे जग, जाणून घेऊया पूर्ण सत्य !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2017 15:16 IST2017-04-08T09:46:15+5:302017-04-08T15:16:15+5:30
या ठिकाणी पॉर्न पाहताना कोणी व्यक्ती आढळल्यास त्याला मृत्यूची सजा दिली जाऊ शकते. अजून जाणून घ्या पॉर्नबाबत पूर्ण वास्तविकता!
.jpg)
पॉर्न इंडस्ट्री : एक वेगळे जग, जाणून घेऊया पूर्ण सत्य !
पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. या विषयावरुन वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे पडसाद उमटताना दिसत असून त्यानुसार विविध देशांतून पॉर्नवर बंदी घालण्याचीही मागणी होत असते. मात्र या विषयाचा एवढा व्याप वाढला आहे की, पॉर्नवर बंदी अशक्य वाटायला लागली आहे. कारण इंटरनेटच्या माध्यमाने ते अजून घराघरात तसेच घरातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचत आहे. आज आपण पॉर्न इंड्रस्टीचे सत्य काय आहे, तेथील वास्तविक जग कसे आहे याबाबत जाणून घेऊया.
जगभरातील एकूण पॉर्न पाहणाऱ्यापैकी भारत, पाकिस्तान आदी देशातील लोकं अधिक पॉर्न पाहतात असे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. भारतामध्ये पॉर्न फिल्म बनविण्यास कायद्याने बंदी आहे. त्यामुळे भारतासारख्या देशात पॉर्न इंड़स्ट्री पहायला मिळत नाही. पण, जगभरातील अनेक देशांमध्ये पॉर्न व्हिडिओ, फिल्म बनवने हा स्वतंत्र व्यवसाय आहे. हजारो लोकांचे जीवन या व्यवसायावर चालते. पॉर्न फिल्म पाहताना आपल्याला त्यातील कलाकारच केवळ महत्त्वाचे असतात असे वाटते. पण, तसे नाही. सर्वसाधारण चित्रपटाप्रमाणेच पॉर्न व्हिडिओ शुट केले जातात.
पॉर्न चिपटात काम करणाऱ्या लोकांसाठी या इंडस्ट्रीने काही नियम ठरवून दिलेले असतात. या कलाकारांची वैद्यकीय चाचणी नियमीत होते. तसेच, एखाद्या व्यक्तीस गुप्तरोग किंवा एचआयव्ही सारख्या रोगांची लागण असेल तर, त्याला अशा चित्रपटांमध्ये काम करता येत नाही. पॉर्न चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या महिला कलाकारांना पुरूष कलाकारांपेक्षा अधिक मानधन मिळते. पण, इतकी माहिती असणे म्हणजे पॉर्नबद्धलचे सत्य तुम्हाला समजले असे मुळीच मानू नका. कारण खरी माहिती तर पुढेच आहे पाहून तुमचे डोळे विस्फारतील.
पॉर्न इंडस्ट्रीबाबतची सत्यत्या
* जगातील सर्वात मोठी पॉर्न इंडस्ट्री कॅनडामध्ये आहे.
* १२ वर्षांपूर्वी सुमारे ७०,००० पॉर्न वेबसाईट होत्या. आजच्या घडीला त्याची संख्या ४.२ मिलियन इतकी झाली आहे.
* खुपच कमी पॉर्न वेबसाईट आहेत, ज्या खऱ्या (ओरिजनल) फिल्म बनवतात. बहुतांश अनेक वेबसाईट या त्यांचा कंटेट दुसºयांकडून विकत घेतात.
* अनेकांना काहिसे आश्चर्य वाटू शकते पण, पॉर्न व्हिडिओ पाहताना सर्वाधिक लोक महिला कलाकारांच्या डोळ्याकडे पाहतात.
* चोवीस तासांपैकी कोणतीही वेळ घेतली असता कमीत कमी, ३०,०००,००० इतके लोक पॉर्न वेबसाईट पाहात असतात. याचाच अर्थ असा की, आता या सेकंदालाही किंवा त्यानंतर एक सेकंदानंतर सुमारे ३०,००,००० लोक पॉर्न वेबसाईट पाहात असतील.
* पॉर्न इंडस्ट्री अमेरिकेतील नॅशनल फुटबॉल लीग, नॅशनल बास्केटबॉल असोशियेशन, मेजर लीग बेसबॉल अनेक मोठे टीव्ही नेटवर्क्स किंवा हॉलिवूड, बॉलिवूड किंवा आयपीएल पेक्षा जास्त पैसे कमावतात. प्रतिवर्षी १३,००० एडल्ट व्हिडिओ बनतात. ज्यात १३ बिलियन डॉलर इतका थेट फायदा होतो. हॉलिवूडची वषार्काटी ५०७ इतके चित्रपट बनविण्याची क्षमता आहे. त्यातुन हॉलिवूडला सुमारे ८.८ बिलीयन इतका फायदा होतो.
* अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार पॉर्न फिल्म व्यक्तिच्या नातेसंबंधावर काय परिणाम करते हे सांगणे मोठे कठीण आहे. कारण पॉर्न पाहिले नाही असा पुरूष मिळण्याचे प्रमाण हजारात एक आढळते.
* इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केले जाणारे पॉर्न ‘MILF’ आहे.
* उत्तर कोरियात पॉर्न पाहण्याबाबत कडक नियम असून, पॉर्न पाहताना कोणी व्यक्ती आढळल्यास त्याला मृत्यूची सजा दिली जाऊ शकते.
* मॉन्ट्रियाल युनिवर्सिटीतील अभ्यासकांच्या मते अलिकडील काही वर्षांमध्ये मुले ही वयाच्या १० वषार्पासूनच पॉर्न पहायला सुरूवात करतात.
* व्हाईट हाऊस डॉट कॉम हीसुद्धा एक पॉर्न वेबसाईट होती.
* अमेरिकेत प्रत्येक ३९ मिनीटांना एक पॉर्न फिल्म बनते.
* अनेक अभ्यासकांचे म्हणणे असे की, पौगंडावस्थेतील मुले ही पॉर्न पाहूनच सेक्स करायला शिकतात.
तर मित्रहो अशा प्रकारे पॉर्न इंडस्ट्रीचे वास्तव आहे. अजब गजब वाटले तरी ते खरे आहे. अनेकांना पचणे कठीण आहे. पण हे वास्तव आहे.
Also Read : Shocking : पॉर्न स्टार घेतात एका सीनसाठी ६५ हजार रुपये, जाणून घ्या संपूर्ण दिनचर्या !