पॉप गायक प्रिन्स सोशल मीडियावर सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:47 IST2016-01-16T01:16:11+5:302016-02-07T06:47:56+5:30
पॉप आयकॉन म्हणून ओळखला जाणारा प्रिन्स इंटरनेट आणि अत्याधुन...

पॉप गायक प्रिन्स सोशल मीडियावर सक्रिय
ज गाव : पॉप आयकॉन म्हणून ओळखला जाणारा प्रिन्स इंटरनेट आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या किती प्रेमात आहे, हे सार्या जगाला ठाऊक आहे. त्याने नुकताच त्याचा इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केला आहे- प्रिन्सेस्टाग्राम. यात प्रामुख्याने व्यावसायिक पातळीवरची छायाचित्रे तो शेयर करीत असतो. मागील आठवड्यातच त्याने हे अकाऊंट सुरू केले. यानिमित्ताने काही विनोदी घटनाही घडल्या. एका प्रसिद्ध विनोदी टी. व्ही. कार्यक्रमात विनोदवीर चार्ली मर्फी हा 'चॅपेल्स शो' मध्ये प्रिन्सची भूमिका वठवतो. खर्या प्रिन्सने इन्स्टाग्रामवर त्या छायाचित्रासोबत लिहिले आहे-''हे मला बोअर करते.'' प्रिन्स आधी ऑनलाईन म्युजिकसाठी काम करायचा. २0१0 मध्ये तो यातून बाहेर पडला. मागील वर्षी तो फेसबूक आणि ट्विटर वापरू लागला. अनेक संगीतकार आपले संगीत लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी यांचा वापर करतात हे त्याला कळले होते. परंतु, काहीच दिवसांत त्याने हे अकाऊंट बंद करून टाकले.