पोकेमॉन झाला वीस वर्षांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 05:25 IST2016-03-02T12:25:28+5:302016-03-02T05:25:28+5:30

 पोकेमॉन व्हिडियोगेम तयार होऊन आता वीस वर्ष पूर्ण झाली आहेत.

Pokémon was twenty years old | पोकेमॉन झाला वीस वर्षांचा

पोकेमॉन झाला वीस वर्षांचा

ान मुलांचा सर्वात आवडीचा कार्टून हीरो म्हणजे पोकेमॉन. त्यावर आधारित पोकेमॉन व्हिडियोगेम तयार होऊन आता वीस वर्ष पूर्ण झाली आहेत. सर्वात यशस्वी व्हिडियो गेम म्हणून पोकेमॉन ओळखला जातो. पिकाचू, स्क्वर्टल, चारिझार्ड आणि इतर कॅरेक्टर्सचे लहान मुलांना प्रचंड आर्कषण आहे.

२७ फे ब्रुवारी, १९९७ मध्ये सर्वप्रथम जपानमध्ये पोकेमॉन रेड आणि ग्रीनची सुरूवात झाली. तुफान हीट ठरलेल्या गेमच्या पुढे वीस कोटींपेक्षा अधिक प्रति खपल्या. एवढेच नाह तर पोकेमॉनवर आधारित कार्टूनचे ९०० एपिसोड बनलेले आहेत, १९ चित्रपट तयार झाले आहेत आणि एक प्रसिद्ध पत्त्यांचा खेळही आहे.

एवढी वर्षे होऊनही पोकेमॉनची क्रेझ कमी झालेली नाही. मालक कंपनी ‘नीन्टेंडो’ला दरवर्षी पोकेमॉन मर्चंडाईमुळे १.५ बिलियन डॉलर्सची कमाई होते.

Web Title: Pokémon was twenty years old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.