‘प्लेबॉय’ मॅगझिनचे नवे ‘फ्लर्टी’ रूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:50 IST2016-02-06T03:20:30+5:302016-02-06T08:50:30+5:30

‘प्लेबॉय’ मॅगझिन आता रूप बदलू पाहत आहे. तमाम मुलांचे ‘गिल्टी प्लेजर’ असलेल्या प्लेबॉयमध्ये आता नग्न छायाचित्र दिसणार नाहीत.

'Playboy' magazine's new 'Flirti' look | ‘प्लेबॉय’ मॅगझिनचे नवे ‘फ्लर्टी’ रूप

‘प्लेबॉय’ मॅगझिनचे नवे ‘फ्लर्टी’ रूप

्लेबॉय’ मॅगझिनचे नवे ‘फ्लर्टी’ रूप

सहा दशकांपासून संपूर्ण जगाच्या पुरुषांचे फेव्हरेट ‘प्लेबॉय’ मॅगझिन आता रूप बदलू पाहत आहे. तमाम मुलांचे ‘गिल्टी प्लेजर’ असलेल्या प्लेबॉयमध्ये आता नग्न छायाचित्र दिसणार नाहीत. अनेकजणांना हा बदल आवडणार नाही परंतु, लेटेस्ट प्लेबॉय इश्युचे कव्हर पाहून त्यांचे मत नक्की बदलणार. कारण थेट नग्न नाही पण अत्यंत खुबीने मॉडेल पोज देताना दिसतील. नोबेल पारितोषिक विजेते लेखक महान अर्नेस्ट हेमिंगवे यांची पणती (ग्रे्रट-ग्रँडडॉटर) ड्री हेमिंगवे मार्च महिन्याच्या इश्युची प्लेमेट असणार आहे.
पहिलीवहिली ‘नो न्यूड’ आवृत्ती 12 फेब्रुवारी रोजी अमेरिकते उपलब्ध होणार आहे. मॅगझिनच्या 62 वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची आवृत्ती प्रकाशित होत आहे. ड्री हेमिंगवेसोबत मुखपृष्ठावर सोशल मीडिया क्वीन सेराह मॅकडॅनियलही झळकणार आहे. कव्हरपेज फोटोमध्ये दोघी जणी अत्यंत तोडक्या कपड्यांत हात आणि बेडशीटने अंग झाकलेल्या असून त्यांच्या चेहºयावर मादक भाव आहेत. अगदी खºयाखुºया स्थितील महिलांचे सौंदर्य दाखविण्याचा उद्देश या नव्या प्रकारच्या प्लेबॉयचा आहे.
ह्यू हेफ्नर यांनी 1953 साली प्लेबॉयची सुरूवात केली होती. आॅक्टोबर महिन्यात त्यांनी घोषणा केली की, 2016 पासून प्लेबॉय महिलांचे नग्न फोटो प्रकाशित करणार नाही. या निर्णयाचे कारण सांगताना त्यांनी सांगितले की, ‘आजच्या इंटरनेट युगात उपलब्ध असणाºया पोर्नोग्राफीमुळे असे नग्न फोटो मॅगझीनमध्ये छापणे कालबाह्य झाले आहे.’ अलिकडच्या काळात प्लेबॉयच्या खपामध्ये फार मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. 1975 साली 56 लाख वितरण असलेले प्लेबॉय आता आठ लाखांपर्यंत कमी झाले आहे.

Web Title: 'Playboy' magazine's new 'Flirti' look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.