फेसबुक मेसेंजरवर आता खेळा विविध गेम्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 17:29 IST2016-12-01T17:29:00+5:302016-12-01T17:29:00+5:30
फेसबुकने आपल्या युजर्ससाठी आता मेसेंजरवरच विविध गेम्स खेळण्याची सुविधा प्रदान केली असून, त्यासाठी ‘इन्स्टंट गेम्स’ हे नवीन फिचर प्रदान केले आहे.
.jpg)
फेसबुक मेसेंजरवर आता खेळा विविध गेम्स!
फ सबुकने आपल्या युजर्ससाठी आता मेसेंजरवरच विविध गेम्स खेळण्याची सुविधा प्रदान केली असून, त्यासाठी ‘इन्स्टंट गेम्स’ हे नवीन फिचर प्रदान केले आहे.
सध्या या इंस्टंट गेम्स फिचरवर १७ गेम्स असून त्यात पॅक-मॅन, गलंगा, अर्कनॉईड, स्पेस इन्व्हेडर्स, ट्रॅक अँड फिल्ड १०० मीटर्स, शफल कॅट मिनी, वुडस विथ फ्रेंडस् फ्रेन्झी, हेक्स एव्हरविंग, एंडलेस लेक, टेंपलर २०१४८, द ट्राईब पझल रश, २०२० कॉन्टॅक्ट, पझल बॉबल, झुकिपर, ब्रिक पॉप आणि वर्डअलॉट एक्सप्रेस आदींचा समावेश आहे. फेसबुक मेसेंजरच्या ताज्या अपडेटमध्ये ही सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यासाठी कोणत्याही मित्राशी संभाषण करण्यासाठी देण्यात आलेल्या बॉक्सच्या खाली एक खास बटन देण्यात आले आहे. यावर क्लिक करून कुणीही आपल्याला हवा तो गेम निवडून खेळू शकतो. आपण खेळून झाल्यानंतर आपल्या मित्राला याबाबत माहिती मिळून तोदेखील स्वतंत्रपणे कोणताही गेम खेळू शकतो. मेसेंजरचा सर्च विभाग अथवा फेसबुकच्या न्यूज फिडमध्येही हे गेम्स सर्च करता येणार आहेत. तर फेसबुक अॅपमध्ये गेम ‘बुकमार्क’ करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. सध्या काही युजर्सला हे अपडेट मिळाले असून, येत्या काही दिवसांमध्ये ते जगभरातील सर्व युजर्ससाठी प्रदान करण्यात येणार आहे. वेब, अँड्रॉईड आणि आयओएस या तिन्हींसाठी ही सुविधा मिळणार आहे.