पेरिसच्या जीवनावर आधारित चित्रफित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2016 14:53 IST2016-05-14T09:23:52+5:302016-05-14T14:53:52+5:30

सामाजिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेली पेरिस हिल्टन स्वत:च्या जीवनावर आधारित एक चित्रफित बनवित आहे. सुत्रानुसार हिल्टन ९.१४ पिक्चर्स तथा एक्सवायझेड फिल्म्स कंपनीसोबत ही चित्रफित बनवित आहे.

Pictures based on the life of Paris | पेरिसच्या जीवनावर आधारित चित्रफित

पेरिसच्या जीवनावर आधारित चित्रफित

माजिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेली पेरिस हिल्टन स्वत:च्या जीवनावर आधारित एक चित्रफित बनवित आहे. सुत्रानुसार हिल्टन ९.१४ पिक्चर्स तथा एक्सवायझेड फिल्म्स कंपनीसोबत ही चित्रफित बनवित आहे. दिग्दर्शक डॉन आर्गोट आणि शीना जॉइस यांनी सांगितले की, पेरिसबाबत लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. कारण बरेचसे लोक तिला आधुनिक मर्लिन मुनरो असे संबोधतात. ती सुंदर आहे, प्रतिष्ठित आहे. शिवाय जगभरात प्रसिद्ध आहे. केवळ लोकांमध्ये असलेला गैरसमज माध्यमांनी चुकीच्या पद्धतीने पसरविल्याने तिची नाहक बदनामी होत आहे. आम्ही जनता, माध्यमे आणि राजकारण्यांसोबत पेरिसचे असलेल्या संबंधाचा आढावा घेण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान अद्यापपर्यंत या चित्रफितचे नाव निश्चित केलेले नाही. चित्रफितीचे शूटिंग स्पेनमध्ये केले जाणार आहे.

Web Title: Pictures based on the life of Paris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.