मॉर्डन ब्राइडच्या रूपामध्ये क्लासी दिसत होती करिना कपूर खान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 19:05 IST2019-03-05T19:04:52+5:302019-03-05T19:05:10+5:30
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपून खान आपला अभिनय आणि चित्रपटांसोबत फॅशन आणि ड्रेसिंग सेन्ससाठीही नेहमीच चर्चेत असते. तैमूरच्या जन्मानंतर करिनाने आपल्या वर्कआउट आणि डाएट फॉलो करून पुन्हा आपल्या ग्लॅमर्स अदांनी सर्वांनाच घायाळ केलं.

मॉर्डन ब्राइडच्या रूपामध्ये क्लासी दिसत होती करिना कपूर खान
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपून खान आपला अभिनय आणि चित्रपटांसोबत फॅशन आणि ड्रेसिंग सेन्ससाठीही नेहमीच चर्चेत असते. तैमूरच्या जन्मानंतर करिनाने आपल्या वर्कआउट आणि डाएट फॉलो करून पुन्हा आपल्या ग्लॅमर्स अदांनी सर्वांनाच घायाळ केलं. करिनाची प्रत्येक स्टाइल आणि लूक क्लासी असण्यासोबतच हटकेही असतो. बॉलिवूडमध्ये झिरो फिगरचा ट्रेन्ड आणणारी बॉलिवूडची बेबो करिना नेहमीच बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाते.
एवढचं नाही तर नो-मेकअप लूकमध्येही करिना सर्वांचं लक्षं आपल्याकडे वेधून घेते. विदआउट हेव्ही ज्वेलरी आणि अक्सेसरीजच्या मॉर्डन नववधू लूकमध्येही बोल्ड आणि स्टायलिश दिसत होती करिना...
फेमिना वेडिंग टाइम्स मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी करिनाने स्पेशल फोटोशूट केलं असून ज्यामध्ये new age मॉर्डन ब्राइडच्या रूपामध्ये ती फार सुंदर दिसत होती.
करिनाचे हे तीन वेगवेगळे लूक्स प्रसिद्ध फॅशन डिझायनर तरूण तहिलियानी यांनी डिझाइन केले होते.
सिल्वर कलरच्या शिमरी ऑफ-शोल्डर ब्लाउजसोबत पिंक आणि गोल्डन कलरचा हेव्ही वर्क असलेला लेहेंगा , मेसी हेयर आणि एक्सेसरीज म्हणून हातांमध्ये फक्त ब्रेसलेट. या सिंम्पल लूकमध्ये ती फार एखाद्या राजकुमारीप्रमाणे दिसत होती.
दुसऱ्या लूकबाबत बोलायचे झाले तर गोल्डन कलरचा हा लेहेंगा, प्लंजिंग नेकलाइन असलेल्या हार्ट शेप हेवी वर्कच्या शिमरी चोली आण लेहेंग्याला मॅचिंग दुपट्टा, कानांमध्य मोठे इयरिंग्ज आणि मोकळ्या केसांमध्ये करिना खरचं क्लासी दिसत होती.
तिसऱ्या लूकमध्ये करिना गोल्डन रंगाची नेट असलेली शिमरी साडीमध्ये आणि मॅचिंग ऑफ शोल्डर ब्लाउज आणि मोकळ्या केसांसोबत ती हॉट आणि सेक्सी दिसत आहे.