सर्वाधिक बुद्ध्यांक असणाºया व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 00:32 IST2016-02-04T05:13:12+5:302016-02-13T00:32:30+5:30

जगभरातील हुशार लोक

The person who has the highest IQ | सर्वाधिक बुद्ध्यांक असणाºया व्यक्ती

सर्वाधिक बुद्ध्यांक असणाºया व्यक्ती

ंदू हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या शरीर रचनेचा प्रमुख भाग आहे. मेंदू नक्की काय करतो, ज्यामुळे लोक इतके हुशार होतात. काही जण जन्मजातच ‘ढ’ असतात, तर काही जणांना हुशारपणाची देणगी मिळालेली असते. जगात सध्या सर्वात हुशार कोण आहेत, त्यांची माहिती या ठिकाणी देत आहोत...

टेरेन्स टाओ (बुद्ध्यांक २३०)
अत्यंत बुद्धिमान असणाºया टाओ यांचा बुद्ध्यांक २३० इतका आहे. जगातील सर्वात हुशार व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. आॅस्ट्रेलियन मुळ असणारे चीनी अमेरिकन गणितीतज्ञ टाओ हे गुणसुत्राचे वर्गीकरण, विविध समीकरणे, मिश्रणे, रॅम्से थिअरी, रँडम मॅट्रीक्स थेअरी आणि इतर अनेक सिद्धांतावर काम करीत असतात. वयाच्या आठव्या वर्षी टाओ यांनी प्री-१९९५ सॅट परीक्षेत ७६० गुण मिळविले होते. वयाच्या २० व्या वर्षी पीएच. डी. मिळविली आणि २४ व्या वर्षी ते युक्लाचे प्राध्यापक बनले. २००३ साली त्यांनी क्ले रिसर्च अ‍ॅवॉर्ड मिळविले. २००२ साली बोचर मेमोरिअल प्राईज तर २००० साली सलेम पुरस्कार मिळविला.

ख्रिस्तोफर हिराटा  (बुद्ध्यांक २२५)
बालपणापासूनच ख्रिस्तोफर हा अत्यंत हुशार म्हणून गणला गेला. वयाच्या १२ व्या वर्षी आंतराष्टÑीय भौतिकशास्त्र आॅलिम्पियाडमध्ये तो पहिला आला. वयाच्या १६ व्या वर्षी त्याने मंगळ ग्रहासंदर्भात सुरु असलेल्या संशोधनात नासामध्ये भाग घेतला. वयाच्या २२ व्या वर्षी प्रिन्सटोन विद्यापीठातून त्यानी पीएच. डी. मिळविली. हिराटा हा अत्यंत बुद्धिमान मुलगा असल्याचे सिद्ध झाले. सध्या ते सीआयटी (कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

किम युँग-याँग  (बुद्ध्यांक २१०)
२१० बुद्ध्यांक असणाºया कोरियन स्थापत्य अभियंता युँग-याँग यांचे पाय लहानपणापासूनच पाळण्यात दिसत होते. सहाव्या महिन्यातच ते बोलायला शिकले आणि कोरियन आणि इतर भाषा समजू लागले. वयाच्या तिसºया वर्षी त्यांना अनेक भाषा अवगत झाल्या. त्यात कोरियन, जपानी, जर्मन आणि इंग्रजीचा समावेश होता. या काळात त्यांनी त्यांनी जपानी टीव्हीवरील अनेक अवघड प्रश्न सोडविले. सर्वाधिक बुद्ध्यांक असणारा म्हणून गिनीज बुकात त्यांची नोंद झाली आहे.

डॉ. इव्हँजेल्स कॅटसिओलिस  (बुद्ध्यांक १९८)
बुद्धिमत्ता चाचणीत सर्वाधिक गुण मिळवून प्रसिद्ध झालेल्या डॉ. इव्हँजेल्स कॅटसिओलिस हे ग्रीकचे नागरिक आहेत. ते वैद्यकीय क्षेत्रात आणि मानसोपचार क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांनी तत्वज्ञान, वैद्यकीय संशोधन शास्त्र आणि मानसोपचारऔषधीशास्त्रची पदवी मिळविली आहे. जागतिक गुणवत्ता संस्था (विन)चे ते संस्थापक आहेत. यामध्ये सर्वाधिक बुद्ध्यांक असणाºया व्यक्तींचा समावेश आहे. ते अत्यंत छान चित्रकार आहेत.

ख्रिस्तोफर लंगन (बुद्ध्यांक १९८)
ख्रिस्तोफर यांना बुद्ध्यांक १९५ ते २१० या दरम्यान आहे. सर्वात हुशार अमेरिकन, त्याचप्रमाणे जगातील हुशार व्यक्ती म्हणून त्यांना गौरविण्यात आले आहे. सहाव्या महिन्यातच ते बोलायला लागले आणि तिसºया वर्षी स्वत:च वाचायला लागले. मन आणि स्थिती यामधील संबंधाचा सिद्धांत तयार केला आहे. त्याला ‘कॉग्निटिव्ह-थिअरॉटिकल मॉडेल आॅफ द युनिव्हर्स’ असे नाव दिले आहे.
 

Web Title: The person who has the highest IQ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.