​​विकीपिडीयावरील गतवर्षी लोकप्रिय ठरलेल्या व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 01:09 IST2016-02-20T08:09:29+5:302016-02-20T01:09:29+5:30

​विकीपिडीयावरील गतवर्षी लोकप्रिय ठरलेल्या व्यक्ती जिमी वेल्स आणि लॅरी सँगर यांनी विकीपिडीयाची १५ जानेवारी २००१ साली सुरुवात केली. विकीपिडीया फाऊंडेशन या सामाजिक संघटनेद्वारे सामूहिक सहकार्याने संपादन, बहुभाषक, मोफत इंटरनेट माहितीजाल पुरविण्यात येते. यावर २८६ भाषेतील ३० कोटी लेख असून, इंग्रजी विकीपिडीयामध्ये ४२ लाख लेख आहेत. जगभरातील लोकांनी यावर हे लेख लिहिले आहेत. जवळपास सर्वच लेख या संकेतस्थळावर जाऊन संपादित केले जातात. इंटरनेटवरील हे सर्वात लोकप्रिय आणि संदर्भ काम आहे. जगातील सहाव्या क्रमांकाचे हे संकेतस्थळ असून, ३ कोटी ६५ लाख लोक हे वाचतात. या संकेतस्थळावरील गतवर्षी लोकप्रिय ठरलेल्या व्यक्तींची माहिती देत आहोत. 

People popular in Wikipedia last year | ​​विकीपिडीयावरील गतवर्षी लोकप्रिय ठरलेल्या व्यक्ती

​​विकीपिडीयावरील गतवर्षी लोकप्रिय ठरलेल्या व्यक्ती

मी वेल्स आणि लॅरी सँगर यांनी विकीपिडीयाची १५ जानेवारी २००१ साली सुरुवात केली. विकीपिडीया फाऊंडेशन या सामाजिक संघटनेद्वारे सामूहिक सहकार्याने संपादन, बहुभाषक, मोफत इंटरनेट माहितीजाल पुरविण्यात येते. यावर २८६ भाषेतील ३० कोटी लेख असून, इंग्रजी विकीपिडीयामध्ये ४२ लाख लेख आहेत. जगभरातील लोकांनी यावर हे लेख लिहिले आहेत. जवळपास सर्वच लेख या संकेतस्थळावर जाऊन संपादित केले जातात. इंटरनेटवरील हे सर्वात लोकप्रिय आणि संदर्भ काम आहे. जगातील सहाव्या क्रमांकाचे हे संकेतस्थळ असून, ३ कोटी ६५ लाख लोक हे वाचतात. या संकेतस्थळावरील गतवर्षी लोकप्रिय ठरलेल्या व्यक्तींची माहिती देत आहोत. 
व्हिटनी ह्युस्टन
अमेरिकन गायिका, अभिनेत्री, निर्माती आणि मॉडेल असणारी एलिझाबेथ ह्युस्टन ही प्रसिद्ध पॉप गायिका होती. तिने २००९ साली सर्वाधिक पुरस्कार मिळविणारी गायिका म्हणून गिनीज बुकात आपले नाव नोंदविले. ११ फेब्रुवारी २०१२ साली हृदयविकाराने तिचे निधन झाले.
बराक ओबामा
विकीपिडीयाच्या लोकप्रिय व्यक्तीमध्ये दुसºया क्रमांकावर असणारे बराक ओबामा सध्या अमेरिकेचे राष्टÑाध्यक्ष आहेत. ते पहिले आफ्रो अमेरिकन राष्टÑाध्यक्ष आहेत.
गंगनम स्टाईल
गंगनम स्टाईल हा दक्षिण कोरियन संगीताचा प्रकार आहे. जुलै २०१२ साली संगीतकार साय यांचा साय ६ भाग १ हा अल्बम प्रदर्शित झाला. त्यावर्षी हे गाणे दक्षिण कोरियाच्या गाओन चार्टवर पहिल्या क्रमांकावर आले. याच वर्षी एक कोटी लोकांनी यू ट्युबवर हे गाणे पाहिले. आतापर्यंत हे गाणे १४८६ कोटी वेळा लोकांनी पाहिले आहे. 
मिट रुमनी
विलार्ड मिट रुमनी हे अमेरिकन उद्योजक आणि राजकारणी आहेत. २००३ ते २००७ साली मॅसॅच्युएटस्चे ते ७० वे गव्हर्नर होते. २०१२ साली अमेरिकेच्या राष्टÑाध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाकडून इच्छुक होते.
निकी मिनाज
ओनिका तान्या मिराज ही निकी मिनाज या नावाने प्रसिद्ध आहे. त्रिनिदाद येथे जन्मलेली निकी ही अमेरिकन संगीतकार, गीतकार, अभिनेत्री आणि दूरचित्रवाणीवरील नामवंत कलाकार आहे. ती विकीपिडीयावर ५ व्या क्रमांकावर आहे.
जस्टीन बिबर
जस्टीन ड्र्यू बिबर हा कॅनेडियन पॉप संगीतकार, अभिनेता, गीतकार आहे. बिबरचा व्हिडिओ पाहून २००८ साली अमेरिकन टॅलेंट मॅनेजर स्कुटर ब्राऊन यांनी त्याला प्रकाशात आणला. नंतर ब्राऊन हे त्याचे मॅनेजर झाले.
अ‍ॅडील
सातव्या क्रमांकावर अ‍ॅडील लॉरी ब्ल्यू अ‍ॅडकिन्स आहे. अ‍ॅडील नावाने प्रसिद्ध असणारा हा इंग्रजी गायक, गीतकार, संगीतकार आणि वाद्य वाजविणारा कलाकार म्हणून प्रसिद्ध आहे.
एमिनेम
मार्शल ब्रुस मॅथर्स ३, ज्याला एमीनेम नावाने ओळखले जाते. तो अमेरिकन रॅपर, रेकॉर्ड प्रोड्युसर, गीतकार आणि अभिनेता आहे.
रिहाना
रिहाना ही नवव्या क्रमांकावर आहे. बार्बेडियन रेकॉर्डिंग कलाकार, अभिनेत्री, फॅशन डिझायनर आहे. सेंट मिशेल, बार्बाडोस येथे जन्मलेल्या रिहानाने २००३ साली रेकॉर्ड प्रोड्युसर इव्हान रॉजर्ससोबत आपल्या करिअरला सुरुवात केली.
अ‍ॅडॉल्फ हिटलर
जर्मन राजकारणी, नाझी पार्टीचा नेता अ‍ॅडॉल्फ हिटलर दहाव्या स्थानी आहे. १९३३ ते १९४५ या काळात हिटलर जर्मनीचा चॅन्सलर आणि हुकूमशहा होता.

Web Title: People popular in Wikipedia last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.