‘गौहर रजा प्रकरणी १ कोटींची नुकसानभरपाई द्या’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 08:43 IST2016-03-17T15:43:26+5:302016-03-17T08:43:26+5:30
शायर गौहर रजा यांना आपल्या एका कार्यक्रमात ‘देशद्रोही’ ठरवणाºया एका वृत्त वाहिनीने जाहिर माफी मागावी तसेच एक कोटी रूपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी गतकाळातील सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागौर, सुप्रसिद्ध अभिनेते नसीरूद्दीन शहा, चर्चित कवी अशोक वाजपेयी तसेच लोकप्रीय गायिका शुभा मुद्गल यांनी केली आहे.

‘गौहर रजा प्रकरणी १ कोटींची नुकसानभरपाई द्या’
श यर गौहर रजा यांना आपल्या एका कार्यक्रमात ‘देशद्रोही’ ठरवणाºया एका वृत्त वाहिनीने जाहिर माफी मागावी तसेच एक कोटी रूपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी गतकाळातील सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागौर, सुप्रसिद्ध अभिनेते नसीरूद्दीन शहा, चर्चित कवी अशोक वाजपेयी तसेच लोकप्रीय गायिका शुभा मुद्गल यांनी केली आहे.
संबंधित न्यूज चॅनलने आपल्या ‘अजफल प्रेमी गैंग का मुशायरा ’ नामक कार्यक्रमात गौहर रजा यांना कथितरित्या ‘देशद्रोही’ ठरवले होते. शर्मिला, नसीरूद्दीन शहा आदींनी यावर तीव्र आक्षेप नोंदवत, यांसदर्भात एक लेखी तक्रार दाखल केली आहे. हा कार्यक्रम न्यूज ब्रॉडकास्टस असोसिएशनच्या आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. चॅनलने माफी न मागितल्यान न्यूज बॉडकास्टर असोसिएशनचा दरवाजा ठोठावू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. गौहर रजा यांनीही तक्रार दाखल केली असून या कार्यक्रमाद्वारे माझी व माझ्या पत्नीच्या प्रतीमेला तडा गेल्याचा दावा केला आहे.
वार्ता