पांडा ‘टिनटिन’ची जगभरात धूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:25 IST2016-02-06T02:55:16+5:302016-02-06T08:25:16+5:30

बेल्जियममधील प्रसिद्ध कॉमिक ‘द अ‍ॅडव्हेंचर्स आॅफ टिनटिन’मधील प्रमुख पात्राच्या नावावरून पांडाच्या पिलाचे हे नाव ठेवण्यात आले आहे. 

Panda 'Tintin's Glow Worldwide | पांडा ‘टिनटिन’ची जगभरात धूम

पांडा ‘टिनटिन’ची जगभरात धूम

नमधील चॉगिंग नगरपालिकेने स्थानिक प्राणीसंग्राहलयातील एका अवाढव्य पांडाच्या पिलाचे नाव ‘टिनटिन’ ठेवले आहे. बेल्जियममधील प्रसिद्ध कॉमिक ‘द अ‍ॅडव्हेंचर्स आॅफ टिनटिन’मधील प्रमुख पात्राच्या नावावरून पांडाच्या पिलाचे हे नाव ठेवण्यात आले आहे. पाच महिने वय असलेल्या या पिलाचा नामकरण सोहळा प्राणीसंग्राहलयाने आयोजित केला होता. जगभरातील लोकांनी सुचवलेल्या १८० नावांपैकी ‘टिनटिन’ हे नाव निवडण्यात आले. चँगिग येथील कॅओ नावाच्या व्यक्तीने हे नाव सुचवले होते.

‘कॉमिक कॅरेक्टरप्रमाणेच हा पांडासुद्धा धाडसी, साहसी असेल. त्याबरोबच टिनटिन नावामुळे जगभरातील लोक आमच्या प्राणीसंग्रहालयाकडे आकर्षित होतील’, अशी अपेक्षा प्राणी संग्राहलयाच्या व्यवस्थापकांनी व्यक्त केली. ३० आॅगस्ट रोजी मादा पांडा ‘याया’ने टिनटिनला जन्म दिला होता. ‘याया’चे हे पाचवे पिलू असून वजन ९.२ किग्रॅ आहे. आता चाँगिंग प्राणीसंग्राहलयात १२ जायंट पांडा आहेत. 
बेल्जियमचे महान कार्टूनिस्ट जॉर्ज रेमी यांनी ‘टिनटिन’ची निर्मिती केली होती. ‘हर्ज’ या टोपणनावाने त्यांनी टिनटिन नावाच्या एका पत्रकार व शोधकाच्या साहसकथा ‘अ‍ॅडव्हेंचर्स आॅफ टिनटिन’मध्ये साकारल्या आहेत. जगभरातील १२ पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांचा अनुवाद झाला असून रेडिओ, नाटक, टीव्ही आणि फिल्म अशा सर्वच प्रकारात त्यांचे रुपांतर झाले आहे. अलिकडे स्टिव्हन स्पीलबर्ग यांनी टिनटिनवर फार सुंदर सिनेमा काढला होता. मात्रा पांडा देखील टिनटिन नावाने धूम करणार असल्याचे दिसते. 

Web Title: Panda 'Tintin's Glow Worldwide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.