/>अभिनेता डेविड हॅसलहोफने सांगितले की, तो त्याची जवळची मैत्रिण अभिनेत्री पामेला एंडरसनचा सेक्स टेप बघुच शकत नाही. कारण १९९२ ते १९९७ या पाच वर्षाच्या दरम्यान हॅसलहोफने ‘बेवॉच’ तिच्यासोबत काम केले आहे. पामेलाचा हनीमुन व्हिडीओ इंटरनेटवर नुकताच लीक झाल्याने सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ‘पामेला एंडरसन अॅँड टॉमी ली : हार्डकोर अॅँड अंसेंसर्ड’ नावाचा हा व्हिडीओ अॅडल्ट कंपनी विविध इंटरटेंमेंटला कायदेशीररित्या वितरीत करण्यात आला आहे. जेनी मेककार्थीच्या टेलीव्हिजन प्रोग्राम ‘डर्टी, सेक्सी, फनी’मध्ये जेव्हा हॅसलहोफला या व्हिडीओबाबत विचारण्यात आले तेव्हा त्याने मी हा व्हिडीओ कधीही बघणार नसल्याचे स्पष्ट केले. पामेला माझ्या बहिणीसारखी असल्याने हे धाडस माझ्याकडून कधीच होणार नसल्याचे त्याने सांगितले.