​पल्लवी शारदा आता हॉलिवूडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 15:16 IST2016-05-28T09:46:24+5:302016-05-28T15:16:24+5:30

आयपीएलच्या 'एक्स्ट्रा इनिंग्ज टी 20'ची अँकर पल्लवी शारदा यंदा चांगलीच चर्चेत आहे. आॅस्ट्रेलियन नागरिक असलेली भारतीय वंशाची पल्लवी आता हॉलिवूडमध्येही दिसणार आहे.

Pallavi Sharda is now in Hollywood | ​पल्लवी शारदा आता हॉलिवूडमध्ये

​पल्लवी शारदा आता हॉलिवूडमध्ये

पीएलच्या 'एक्स्ट्रा इनिंग्ज टी 20'ची अँकर पल्लवी शारदा यंदा चांगलीच चर्चेत आहे. आॅस्ट्रेलियन नागरिक असलेली भारतीय वंशाची पल्लवी आता हॉलिवूडमध्येही दिसणार आहे. हॉलिवूडमध्ये लहानसहान नाही तर चक्क देव पटेल, निकोल किडमन आणि रुनी मारा यांची भूमिका असलेल्या 'लायन' या सिनेमात पल्लवी चमकणार आहे. पल्लवीचे आईवडिल भारतीय असून आॅस्ट्रेलियातील नामवंत अभ्यासक आहेत.

वडील नलीनकांत शारदा व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटीत प्राध्यापक आहेत, तर आई हेमा युनिव्हर्सिटी आॅफ वेस्टर्न आॅस्ट्रेलियात प्राध्यापक आहे. स्वत: पल्लवी ही उच्चविद्याविभूषित आहे. लॉ, मास कम्युनिकेशनमध्ये पदवी आणि आधुनिक भाषांत डिप्लोमा केला आहे. मिस इंडिया आॅस्ट्रेलिया 2010 ही स्पर्धा जिंकल्यानंतर तिचे मॉडेलिंग आणि सिनेमातील करिअर सुरू झाले. शाहरूखच्या 'माय नेम इज खान'मध्ये तिची लहान भूमिका होती. मनोज वाजपेयीचा दस तोला यात तिची मुख्य भूमिका होती. याशिवाय एक इंडो अमेरिकन सिनेमा वॉअवेमध्येही तिने काम केले आहे. तसेच आॅस्ट्रेलियन सिनेमा 'सेव्ह युअर लेग्ज'मध्ये तिची भूमिका होती. 'सेव्ह युअर लेग्ज'मध्ये तिच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. हिरोईन, लव्ह ब्रेकअप जिंदगी या सिनेमातूनही तिने भूमिका केल्या आहेत. यंदाच्या आपीएलमध्ये तिची वर्णी लागली

Web Title: Pallavi Sharda is now in Hollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.