गार्सियाने व्यक्त केल्या वेदना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 21:22 IST2016-05-10T15:49:35+5:302016-05-10T21:22:43+5:30
‘हॉलीवुड एक्सिस’ची अभिनेत्री आणि पॉप स्टार प्रिंसची पत्नी मेयते गार्सियाने एका पुरस्कार सोहळ्यात दु:ख व्यक्त करताना सांगितले की, पती प्रिंसपासून जन्मलेल्या मुलाचा जन्म होताच एका आठवड्यातच प्रिन्सचा मृत्यू झाल्याने तिचे आई होण्याचे स्वप्न दुंभगले होते.

गार्सियाने व्यक्त केल्या वेदना
‘ ॉलीवुड एक्सिस’ची अभिनेत्री आणि पॉप स्टार प्रिंसची पत्नी मेयते गार्सियाने एका पुरस्कार सोहळ्यात दु:ख व्यक्त करताना सांगितले की, पती प्रिंसपासून जन्मलेल्या मुलाचा जन्म होताच एका आठवड्यातच प्रिन्सचा मृत्यू झाल्याने तिचे आई होण्याचे स्वप्न दुंभगले होते. सिंगल मॉम्स अवॉर्डस कार्यक्रमादरम्यान तिने ही दु:खद घटना जाहिरपणे कथन केली. १९९६ मध्ये गार्सिया आणि प्रिंसला ग्रेगरी नावाचा मुलगा झाला होता. मात्र या मुलाच्या जन्मानंतर आठवडाभरातच प्रिंसचे निधन झाले. त्यानंतर गार्सिया प्रचंड व्यतीत झाली होती. पुढे तिने स्वत:ला सावरताना ‘हॉलीवुड एक्सिस’मध्ये काम केले. पुढे बोलताना ती म्हणाली की, २१ एप्रिल रोजी प्रिंसचे निधन झाले. ही वेळ माझ्यासाठी अतिशय भावनात्मक होती. प्रिंस आपल्यात नाही, हे मला आजही पटत नाही. त्यामुळे मी या विषयावर बोलणे टाळते, असेही ती यावेळी म्हणाली. प्रिंस आणि गार्सियाचे १९९६ ते २००० या दरम्यान वैवाहिक संबंध होते.