भारतामधील उत्कृष्ट फॅशन डिझायनर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 02:43 IST2016-02-23T09:43:25+5:302016-02-23T02:43:25+5:30

​भारतामधील उत्कृष्ट फॅशन डिझायनर्स अनेक चित्रपटात किंवा पार्टीजमध्ये वेगवेगळ्या फॅशन्सची भरमार दिसते. प्रत्येक वेळा नवे काही तरी देण्याचा प्रयत्न हे फॅशन डिझायनर्स करीत असतात. भारतामधीलच नव्हे तर आंतरराष्टÑीय स्तरावरही भारतीयांनी फॅशन्सच्या बाबतीत आपला ठसा उमटविला आहे. भारत हा बहुविध संस्कृती असणारा देश आहे. त्यामुळे फॅशनच्या दुनियेत नेहमी काही तरी वेगळे होत असते. अशा फॅशन डिझायनर्सची माहिती देत आहोत.

Outstanding Fashion Designers in India | भारतामधील उत्कृष्ट फॅशन डिझायनर्स

भारतामधील उत्कृष्ट फॅशन डिझायनर्स

ेक चित्रपटात किंवा पार्टीजमध्ये वेगवेगळ्या फॅशन्सची भरमार दिसते. प्रत्येक वेळा नवे काही तरी देण्याचा प्रयत्न हे फॅशन डिझायनर्स करीत असतात. भारतामधीलच नव्हे तर आंतरराष्टÑीय स्तरावरही भारतीयांनी फॅशन्सच्या बाबतीत आपला ठसा उमटविला आहे. भारत हा बहुविध संस्कृती असणारा देश आहे. त्यामुळे फॅशनच्या दुनियेत नेहमी काही तरी वेगळे होत असते. अशा फॅशन डिझायनर्सची माहिती देत आहोत.
मनीष मल्होत्रा
भारतामधील विख्यात फॅशन डिझायनर. बेस्ट फॅशन डिझायनर्स आॅफ इंडिया २०१५ चा पहिल्या क्रमांकाचा ड्रेस डिझायनर म्हणून त्याची निवड. बॉलीवूडचेही ते सर्वात आवडते आहेत. त्यांचे स्वत:चे रिव्हीरी नावाचे स्टोअर आहे. देशभरातील टॉप सेलिब्रिटी आणि मोठ्या कुटुंबाचे ड्रेस डिझाईन करतात.
तरुण ताहिलयानी
भारतामधील मोठ्या फॅशन डिझायनर्सपैकी एक आहेत. पत्नी सैलजा ‘सल’ ताहिलयानी यांच्यासोबत १९८७ साली त्यांनी भारतामधील पहिले मल्टीडिझायनर बुटीक सुरु केले. १९९० साली ताहिलयानी स्टुडिओची सुरुवात केली. ते न्यूयॉर्कच्या फॅशन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे माजी विद्यार्थी आहेत.
वेंडेल रॉड्रीक्स
भारताच्या पश्चिमेला गोव्यामध्ये वेंडेल रॉड्रीक्स हे विख्यात फॅशन डिझायनर म्हणून ओळखले जातात. फॅशनमध्ये वाईड रेंजमध्ये त्यांचा समावेश आहे. वर्ल्ड कॉश्चुम हिस्ट्रीपासून ते फॅशन जर्नलिझम आणि इंटरनॅशनल अ‍ॅडव्हर्टायझिंग कॅम्पेनसंदर्भात शिकवितात. २०१४ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. 
रितू कुमार
रिुतू कुमार या बेस्ट फॅशन डिझायनर्सपैकी एक आहेत. समकालिन तसेच पारंपरिक पद्धतीने त्या डिझाईन करतात. मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्समध्ये त्यांनी कॉश्चुम डिझायनिंग केले. 
अबु जानी आणि संदीप खोसला
हे दोघे नावाजलेले फॅशन डिझायनर्स आहेत. युरोपियन पद्धतीनुसार भारतीय हस्तकला आणि वस्त्रोद्योग क्षेत्राला नवे आयाम मिळवून देण्यात त्यांचा वाटा आहे. पारंपरिक आणि नव्या पद्धतीने डिझाईन्स करतात. हार्डोस येथे प्रदर्शन करणारे ते पहिले भारतीय डिझायनर्स आहेत.
सब्यसाची मुखर्जी
कोलकाता येथे जन्मलेले सब्यसाची हे १९९९ पासून या क्षेत्रात आहेत. सब्यसाची या नावाने आपले उत्पादन विक्री करतात. फॅशन डिझाईन कौन्सिल आॅफ इंडियाचे ते सदस्य आहेत. नॅशनल म्युझियम आॅफ इंडियन सिनेमाचे ते सर्वात तरुण सदस्य आहेत. वधूंचे कपडे आणि इथिनिक डिझाईन्ससाठी ते प्रसिद्ध आहेत.
जेजे वलया
जे जे वलया हे भारतामधील सर्वात विख्यात फॅशन डिझायनर आहेत. हाऊस आॅफ वलयाची निर्मिती त्यांनी केली. आपले बंधू टीजे सिंग यांच्यासह १९९२ साली लाईफस्टाईल हाऊस सुरू केले. फॅशन डिझायनिंग कौन्सिल आॅफ इंडियाचे ते संस्थापक सदस्य आहेत.
रिना ढाका
८० च्या दशकापासून रिना ढाका या प्रसिद्ध आहेत. युव रतन अ‍ॅवॉर्डने त्यांना गौरविण्यात आले आहे. पाश्चिमात्य डिझाईन्समध्ये त्या पारंगत आहेत. त्यांना फ्युजन करायला देखील आवडते. त्यांचे पॅरीस, लंडन, न्यूयॉर्क आणि दुबईमध्ये प्रदर्शन झाले आहे.
रोहित बाल
हस्तकलेत माहीर असणारे भारतामधील विख्यात डिझायनर आहेत. भारतामधील पारंपरिक कलेला त्यांनी पुढे आणले. पामेला अँडरसन, नाओमी कॅम्पबेल, सिंडी क्रॉफोर्ड आणि अ‍ॅना कुर्निकोव्हा हे त्यांचे क्लायंटस् आहेत.
रितू बेरी
ग्रेस आणि स्टाईलमध्ये रितू बेरी हे नाव गाजलेले आहे. पॅरीसमध्ये त्यांनी पहिल्यांदा केलेल्या प्रदर्शनामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण झाली. १९९० साली ‘लावण्या’ या नावाखाली त्यांनी सुरुवात केली. एफआयटी, दिल्लीमधून त्यांनी फॅशन डिग्री संपादन केली. 



Web Title: Outstanding Fashion Designers in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.