‘ओस्टेरिआ फ्रान्सेस्काना’ ठरले जगातील सर्वोत्कृष्ट रेस्ट्राँ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 14:50 IST2016-06-14T09:20:49+5:302016-06-14T14:50:49+5:30
इटलीमधील ‘ओस्टेरिआ फ्रान्सेस्काना’ची जगातील सर्वोत्तम रेस्ट्राँ म्हणून निवड करण्यात आली आहे.

‘ओस्टेरिआ फ्रान्सेस्काना’ ठरले जगातील सर्वोत्कृष्ट रेस्ट्राँ
न्यूयॉर्कमध्ये पार पडलेल्या एका शानदार सोहळ्यात 2016 वर्षातील ‘बेस्ट रेस्ट्राँ’ म्हणून त्याला पुरस्कार देण्यात आला. शेफ मासिमो बोटुरा यांच्या ‘ओस्टेरिआ फ्रान्सेस्काना’ने मागच्या वर्षीचा विजेता स्पेनमधील रेस्ट्राँ ‘एल सेलर डी कॅन रोका’ला मागे टाकून हा बहुमान मिळवला.
‘वर्ल्ड्स 50 बेस्ट रेस्ट्राँ’ अवॉर्ड मिळवणारा इटलीतील तो पहिलाच रेस्ट्राँ आहे.
भावनाविविश झालेल्या बोटुराने पुरस्कार स्वीकारताना म्हटले की, माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रम आणि कठोर मेहनतीचे हे फळ आहे. आमच्या कामाला आम्ही ‘कला’ म्हणून पाहतो.
बोटुरांच्या बाबतील परीक्षकांनी नोंदवलेल्या निरीक्षणात म्हटले आहे की, पांरपरिक घटकांना ‘मॉर्डन ट्विस्ट’ देण्याची त्यांची हतोटी कौतुकास्पद आहे. खासकरून ‘फाईव्ह एजेस आॅफ पार्मिगिआनो रेजिआनो’ ही डिश तर लाजवाब!
जगप्रसिद्ध मोडेना शहरात असलेले ‘ओस्टेरिआ फ्रान्सेस्काना’ मागच्या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर तर 2013, 2014 साली तिसऱ्या क्रमांकावर होते. यावर्षी दुसऱ्या क्रमांकावर ‘एल सेलर डी कॅन रोका’ आणि तिसऱ्या स्थानी न्यूयॉर्कस्थित ‘एलेव्हन मॅडिसन पार्क’ची निवड करण्यात आली.
वैयक्तिक पुरस्कारामध्ये एलैन पासर्ड यांना जीवनगौरव, फ्रान्समधील डॉमनिक क्रेन यांना सर्वोत्कृष्ट महिला शेफ आणि पिएरे हर्मे यांना ‘बेस्ट पेस्ट्री’ शेफ म्हणून गौरान्वित करण्यात आले.