​आॅस्कर विजेता एडी रेडमेन ‘प्राडा’चा न्यू फेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 22:12 IST2016-06-16T16:42:15+5:302016-06-16T22:12:15+5:30

एडी रेडमेन जगप्रसिद्ध इटालियन फॅशन ब्रँड ‘प्राडा’च्या आगामी आॅटम विंटर कलेक्शनसाठी मॉडेल बनला आहे.

Oscar winner Eddie Redmen 'Prada' New Face | ​आॅस्कर विजेता एडी रेडमेन ‘प्राडा’चा न्यू फेस

​आॅस्कर विजेता एडी रेडमेन ‘प्राडा’चा न्यू फेस

स्कर विजेता अभिनेता एडी रेडमेन जगप्रसिद्ध इटालियन फॅशन ब्रँड ‘प्राडा’च्या आगामी आॅटम विंटर कलेक्शनसाठी मॉडेल बनला आहे.

आपल्या ‘एडब्ल्यू१६’ कॅम्पेनसाठी तो ‘प्राडा’चा चेहरा बनला आहे.

हाय-एंड टेलरिंग ड्रेसेस, ट्रेंच कोट, निट्स आणि ब्रोग्सच्या या कलेक्शनमध्ये एडी एकदम स्टायलिश दिसत आहे.

एकोणिसाव्या शतकातील निओ-क्लासिकल पेंटिंग्सवरून प्रेरित होऊन या कलेक्शनमधील कपडे डिझाईन करण्यात आल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. फोटोज पाहून ते स्पष्ट दिसतदेखील आहे.

ब्रिटिश अ‍ॅक्टर एडीने यापूर्वी ‘बरबेरी’ या फॅशन ब्रँडसाठीदेखील मॉडलिंग केली आहे. त्याने चित्रपटात येण्यापूर्वी लहानपणीसुद्धा आयर्लंड येथील स्थानिक ब्रांडसाठी मॉडलिंग केलेली आहे.

एडीच्या आधी मायकल शेनॉन हा प्राडाचा मॉडेल होता.

Eddie Redmayne

prada-menswear

prada-menswear

prada-menswear

Photo Credits : Prada
 

Web Title: Oscar winner Eddie Redmen 'Prada' New Face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.