आॅस्कर अभिनेत्री पॅटी ड्युकचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 20:42 IST2016-03-31T03:42:04+5:302016-03-30T20:42:04+5:30

अमेरिकेची आॅस्कर विजेता अभिनेत्री पॅटी ड्यूकचे गेल्या मंगळवारी निधन झाले. पॅटी ६९ वर्षाची होती. समाचार एजेंसीनुसार तिची एजेंट मिशेल स्टब्सने ट्विटरवर सांगितले की, पॅटीचे निधन सेप्टीसीमियामुळे झाले. पॅटीचा जन्म १९४६ मध्ये न्यूयॉर्क शहरात झाला होता.

Oscar actress Patty Duke passes away | आॅस्कर अभिनेत्री पॅटी ड्युकचे निधन

आॅस्कर अभिनेत्री पॅटी ड्युकचे निधन

ेरिकेची आॅस्कर विजेता अभिनेत्री पॅटी ड्यूकचे गेल्या मंगळवारी निधन झाले. पॅटी ६९ वर्षाची होती. समाचार एजेंसीनुसार तिची एजेंट मिशेल स्टब्सने ट्विटरवर सांगितले की, पॅटीचे निधन सेप्टीसीमियामुळे झाले. पॅटीचा जन्म १९४६ मध्ये न्यूयॉर्क शहरात झाला होता. तिचे खरे नाव एन्ना मॅरी ड्यूक असे होते. वयाच्या सातव्या वर्षीच तिने अभिनयास सुरुवात केली. १६ व्या वर्षी ‘द मिरिकल वर्कर’ (१९६३) या चित्रपटासाठी तिला सर्वश्रेष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी आॅस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तिने छोट्या पडद्यावर देखील काम केले असून, दोन गोल्डन ग्लोब आणि तीन एमी अवॉर्ड देखील पटकावले होते. २००४ मध्ये हॉलीवुड वॉक आॅफ फेममध्ये तिचे नाव नेहमीसाठी अमर झाले. पॅटीच्या पश्चात पती मायकल पीयर्स आणि मुलगा सीन आस्टिन आहे.

Web Title: Oscar actress Patty Duke passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.