स्वीडनमध्ये केवळ ६ तासांचे ऑफिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 12:19 IST2016-01-16T01:19:17+5:302016-02-09T12:19:54+5:30

स्वीडन देशामध्ये ऑफिस वर्क टाईम फक्त ६ तास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Only 6 hours office in Sweden | स्वीडनमध्ये केवळ ६ तासांचे ऑफिस

स्वीडनमध्ये केवळ ६ तासांचे ऑफिस

ुतेक सर्वच जण नोकरीमध्ये खूश नसतात. प्रायव्हेट जॉबमध्ये तर नाहीच नाही. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे ऑफिस टाईम. नाही म्हटले तरी ८-१0 तास ऑफिसमध्ये काम करावेच लागते. दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी किंवा पेंडिग काम संपविण्यासाठी प्रत्येकाला ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त काम करावेच लागते. त्यातल्या त्यात सुट्या पण नाही.

कोणाचे मन लागेल असे काम करण्यात? याचाच सखोल विचार करून स्वीडन देशामध्ये ऑफिस वर्क टाईम फक्त ६ तास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बर्‍याच कंपन्यांना वाटते की जास्त वेळ काम केल्यावर लवकर काम होते. मात्र संशोधन सांगते की हे आरोग्य, उत्पादनक्षमता आणि सर्वांगीण समाधानाला धोकादायक असते.

स्वीडनमधील बहुतांश कंपन्यांनी ६ तासांची वर्क पॉलिसी स्वीकारली आहे. येथील 'टोयोटो' कंपनीच्या सर्विस सेंटरने तर १३ वर्षांपूर्वीच वर्कटाईम सहा तासांचा केला होता. यामुळे त्यांचा नफा २५ टक्क्यांनी वाढला आहे. 'आठ तासांचा वेळ जितका वाटतो तितका चांगला नाही.

आठ तास कामावर लक्ष केंद्रित करणे अवघड आहे. कर्मचारी जर खाजगी आयुष्याला वेळ देऊ शकले तर ते ऑफिसचे कामदेखील अधिक चांगल्या प्रकारे करतात. त्यामुळे सहा तासांचा वर्क डे अतिशय परिणामकारक पर्याय आहे, असे स्टॉकहोल्म येथी अँप डेव्हलोपर कंपनी 'फिलीमुंडुस'चे सीईओ लिनस फेल्ट्ड म्हणतात.

Web Title: Only 6 hours office in Sweden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.