/>सध्या क्रिकेट विश्वास वेडिंग सीझन सुरु आहे. यादरम्यान अनेक क्रिकेटपटू लग्नगाठीत अडकले. आता पुढचा नंबर आहे तो, युवीचा. होय, युवराजसिंह याचा. आयपीएलमध्ये बिझी असलेला क्रिकेटपटू युवराज सिंह यालाही लग्नाचे वेध लागले आहे. मॉडेल व अभिनेत्री हेजल किच हिच्यासोबत साखरपुडा उरकला आणि लग्न कधी? असा प्रश्न युवराजला जाईल तिथे विचारला जातो. आत्तापर्यंत युवराज यावर काहीच स्पष्ट बोलत नव्हता. प्रतीक्षा करा, केवळ एवढेच तो सांगायचा. पण आता येत्या एक ते दोन महिन्यात युवराज बोहल्यावर चढणार, हे स्पष्ट झालयं. येत्या एक-दोन महिन्यात लग्न करणार असल्याचे युवराजने आज सीएनएक्सशी बोलताना सांगितले. मी लवकरच मीडियाला मोठ्ठे सप्राईज देणार असल्याचेही तो म्हणाला. आता हे सरप्राईज काय, हे ठाऊक नाही, पण युवी लगे रहो...!