OMG : या ५ प्रकारचे खोटं सहज लपवितात मुली !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2017 12:03 IST2017-03-29T06:31:59+5:302017-03-29T12:03:21+5:30
तुमची गर्लफ्रेंड तुमच्यापासून काहीच लपवत नाही किंवा खोटे बोलतच नाही असे जर आपणास वाटत असेल तर आपण चुकीचे आहेत. तर मग जाणून घेऊया की, गर्लफ्रेंड आपल्याशी किती सहजतेने खोटं लपवते ते.
.jpg)
OMG : या ५ प्रकारचे खोटं सहज लपवितात मुली !
तुमची गर्लफ्रेंड तुमच्यापासून काहीच लपवत नाही किंवा खोटे बोलतच नाही असे जर आपणास वाटत असेल तर आपण चुकीचे आहेत. तर मग जाणून घेऊया की, गर्लफ्रेंड आपल्याशी किती सहजतेने खोटं लपवते ते.
* जर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडच्या समोर दुसऱ्या मुलीची प्रशंसा केली असेल तर त्यावेळी तिला काहीही फरक पडत नाही, असे जरी ती भासवत असेल मात्र ही गोष्ट ती आपल्या मनात दाबून ठेवेल आणि एके दिवशी याच गोष्टीवरु न ती तुमच्यावर संताप व्यक्त करेल.
* मुली सहज सांगतात की, त्या मेकअप करीत नाही किंवा आपल्या त्वचेची काळजी घेत नाही, मात्र तसे काहीही नसून त्या स्वत: चांगल्या दिसण्यासाठी खूपच काळजी घेतात.
* आपल्या ब्वॉयफ्रेंडने त्याच्या मित्रांसोबत वेळ घालविणे किंवा मौज-मस्ती करणे तिला अजिबात आवडत नाही. ती त्यावेळी सहजतेने त्याला बोलेल की, जा आणि मौज-मस्ती कर, वास्तविक तिलादेखील त्या प्रसंगात सहभाग घ्यायचा असतो. पण ती सांगू शकत नाही.
* मुली ब्वॉयफे्रंडच्या संदर्भात सहज स्पेस देण्यास तयार असतात, असे जरी त्या भासवत असतील मात्र खरे हे आहे की, त्यांचा ब्वॉयफे्रंड त्यांच्या नेहमी संपर्कात असावा, त्याने वेळोवेळी चॅट करावी, असे त्यांना नेहमी वाटत असते.
* जेव्हा एखादी मुलगी म्हणत असेल की, ‘मला काहीच माहित नाही, तुझ्या मनाला जसे आवडेल तसे वाग.’ यावरून समजावे की, ती संतापात आहे आणि यावेळी तिची ईच्छा असते की, ती जे सांगेल तसेच समोरच्याने वागायला हवे.
* या सर्व गोष्टी ‘द रिचेस्ट’ वेबसाइट अनुसार सांगण्यात आल्या आहेत, म्हणून प्रत्येक मुलगी असे वागेलच असे नाही.