OMG : "या" कारणांनी मुलींना आवडतात जास्त उंचीचे मुले !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 11:38 IST2017-03-18T06:08:51+5:302017-03-18T11:38:51+5:30
* मुलींना जास्त उंचीच्या मुलांना अलिंगन करताना खूप चांगले वाटते. मुली जेव्हा हग करतात तेव्हा त्यांच्या ह्रदयाची स्पंदने सहज ऐकु शकतात

OMG : "या" कारणांनी मुलींना आवडतात जास्त उंचीचे मुले !
एका सर्वेक्षणानुसार मुलींना जास्त उंचीचे मुले आवडतात असे निदर्शनास आले आहे. जास्त उंचीचा ब्वॉयफ्रेंड असण्याचे फायदे असतात, असे मुलींनी सर्वेक्षण करतेवेळी कबुल केले आहे. चला मग जाणून घेऊया की, असे कोणते फायदे आहेत, ज्यामुळे मुली त्यांच्याकडे आकर्षिल्या जातात.
* मुलींचे असे म्हणणे आहे की, ज्या मुले उंच असतात ते जास्त ताकदवान आणि शक्तिशाली असतात. यामुळे मुलींना असे वाटते की ते त्यांच्या परिवाराची आणि त्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतात.
* मुलींना अशा मुलांसोबत राहणे जास्त सुरक्षित वाटते. मुलींना असे वाटते की, आपण जेव्हाही ताणतणावात असू त्यावेळी त्यांना हे मुले त्यांच्या मिठीत घेतील.
* लहान उंचीच्या तुलनेने जास्त उंचीच्या मुलांमध्ये जास्त आत्मविश्वास असतो. यामुळे मुलींना त्यांच्यासोबत रात्री बाहेर पडताना अजिबात भीती वाटत नाही कारण त्यांना माहित असते की, अशी मुले कुणाला घाबरत नाहीत आणि ते त्यांच्या सुरक्षिततेसाठी कायम तत्पर असतात.
* कमी उंचीच्या मुलांसोबत मुली हाय हिल्स नाही घालू शकत मात्र उंचीने जास्त असलेल्या मुलांसोबत असताना ती पाहिजे तेव्हा मनाप्रमाणे सँडल वापरु शकते.
* मुलींना जास्त उंचीच्या मुलांना अलिंगन करताना खूप चांगले वाटते. मुली जेव्हा जास्त उंचीच्या मुलांना हग करतात तेव्हा त्यांच्या ह्रदयाची स्पंदने सहज ऐकु शकतात.