OMG: Except Sunil Shetty's acting, 'this' is a different world, you will be stunned! | OMG : ​सुनील शेट्टीचे अभिनयाव्यतिरिक्त ‘हे’ आहे वेगळे जग, जाणून व्हाल थक्क!

OMG : ​सुनील शेट्टीचे अभिनयाव्यतिरिक्त ‘हे’ आहे वेगळे जग, जाणून व्हाल थक्क!

बॉलिवूडच्या सेलिब्रिटींची ओळख आपल्याला फक्त पडद्यावरचा हिरो अशीच असते. मात्र या व्यतिरिक्तही त्यांचे आगळेवेगळे जग असते. त्यांच्या या जगाबद्दल आपण अनभिज्ञ असतो. बहुतांश सेलेब्स अभिनयाव्यतिरिक्त स्वत:ला एखाद्या व्यवसायात गुंतवून घेतात. त्यापैकीच एक स्टार म्हणजे सुनील शेट्टी होय.  
काही वर्षांपासून सुनील रुपेरी पडद्यावर दिसला नाही. मात्र या फावल्या वेळेत त्याने मुंबईमध्ये रेस्तराँचा व्यवसाय सुरु केला आहे. आता तर जर त्याला एखासा सिनेमा मिळाला तर तो आवर्जुन करतो पण त्यानंतर त्याचं संपूर्ण लक्ष हे व्यवसायाकडेच असते.सुनील ‘मिसचीफ डायनिंग बार’ आणि ‘क्लब एच २०’ चा मालक आहे. या दोन्ही रेस्तराँकडे तो व्यक्तिगत लक्ष देतो शिवाय हाकिम आलिम याच्या सलॉनमध्ये सुनीलचे ५० टक्के शेअर्स आहेत. न्यूज १८ च्या वृत्तानुसार, सुनीलने त्याचे पैसे अशा पद्धतीने गुंतवले आहेत की, त्याने अनेक छोट्या गोष्टींमध्ये आपले पैसे गुंतवले आहेत. त्यामुळे जरी तो व्यवसाय डबगाईला आला तरी त्याला फार मोठे नुकसान सहन करावे लागणार नाही. पण यामुळे त्याला त्याचे लक्ष एकाच जागी न ठेवता अनेक ठिकाणी ठेवावे लागते. 

Image result for sunil shetty RESTORA

या व्यतिरिक्त पॉपकॉर्न मोशन पिक्चर्स नावाने त्याचे प्रोडक्शन हाऊसही आहे. या प्रोडक्शन हाऊसमधून त्याने ‘रक्त’, ‘भागम भाग’ आणि ‘खेल’ या सिनेमांची निर्मिती केली. याशिवाय ‘आर हाऊस’ नावाचे फॅशन ब्युटिकही सुनील सांभाळतो. या सर्व गोष्टीतून सुनीलचे वार्षिक उत्पन्न हे १०० कोटींच्या जवळपास असल्याचे समजते. 

Web Title: OMG: Except Sunil Shetty's acting, 'this' is a different world, you will be stunned!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.