OMG : बॉयफ्रेंडकडून या ७ गोष्टींची अपेक्षा असते मुलींना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 16:43 IST2017-02-14T11:13:39+5:302017-02-14T16:43:39+5:30

आपणास माहित आहे का आपली गर्लफ्रेंडला काय अपेक्षा आहे आपल्या कडून ?

OMG: Boys expect these 7 things from Boyfriend! | OMG : बॉयफ्रेंडकडून या ७ गोष्टींची अपेक्षा असते मुलींना !

OMG : बॉयफ्रेंडकडून या ७ गोष्टींची अपेक्षा असते मुलींना !

ong>-Ravindra More

प्रत्येक मुलीला आपल्या बॉयफ्रेंडकडून काहीना काही अपेक्षा असतात ज्या ती स्वत:लाही सांगु शकत नाही. मात्र मनातल्या मनात प्रत्येक मुलगीची इच्छा असते की त्या गोष्टी तिला बॉयफ्रेंडने स्वत:हून करायला हव्यात. मग त्या गोष्टी जरी लहान-सहान जरी असल्या तरी करायला हव्यात कारण अशाने नात्यात गोडवा निर्माण होतो आणि असे न केल्याने नात्यात वाद सुरु होतो हे नक्की. आज आपण एक मुलगी आपल्या बॉयफ्रेंडकडून काय अपेक्षा करते याबाबत जाणून घेऊया. 

१. प्रेमाला कोणत्याही उपमेची गरज नसते मात्र एका मुलीला ही अपेक्षा असते की तिचा बॉयफ्रेंड तिच्यावर किती प्रेम करतोय याची जाणीव तिला वारंवार त्याने करुन द्यायला हवी. मुलींना कायमच अपेक्षा असते की तिच्या बॉयफ्रेंडने तिला दिवसभरातून कित्येकदा ‘आय लव्ह यू’ म्हणायला  हवे. 

२. प्रत्येक मुलीमध्ये एक गोष्ट कॉमन असते, किंवा त्यांची नेहमी एकच गोष्टींची ओरड असते की, त्यांना त्यांचा बॉयफ्रेंड वेळ देत नाही, जास्त गप्पा मारत नाही. बरेच मित्र असूनही गर्लफ्रेंडला अपेक्षा असते की, तिच्या बॉयफ्रेंडने तिच्याशी तासनतास गप्पा माराव्यात. 

३. विशेषत: प्रत्येक मुलीला फोटो काढण्याची आवड असते आणि जर तिचा बॉयफ्रेंड असेल तर तिला फोटो फोबियाच होतो. ती बॉयफ्रेंडसोबत असताना जास्तीत जास्त फोटोच काढत असते. कारण ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत घालविलेले प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करीत असते.    

४. प्रत्येक मुलीचा एक आवडता चित्रपट असतो. हा चित्रपट आपल्या बॉयफ्रेंडसोबत पाहावा अशी प्रत्येक मुलीची अपेक्षा असते. 

५. मुलगी स्वत:हून जरी सांगत नसली तरी तिच्या बॉयफ्रेंडने तिला किस करावे असे तिला वाटत असते. शिवाय जान, बाबू, सोना सारखे क्यूट नावानेही बोललेले आवडते. 

६. मुली मनापासून जरी सांगत नसल्या तरी जेव्हा तिच्या बॉयफ्रेंडने तिला महागडे गिफ्ट दिले तर तिला खूपच आवडते. 

७. प्रत्येक मुलीला लहान-सहान गोष्टींवरुन स्तुती ऐकायला खूपच आवडते. त्यांची ईच्छाच असते की, कपड्यांपासून ते त्यांचा स्वभावापर्यंत बॉयफ्रेंडने प्रत्येक गोष्टीची तिची स्तुती करायला हवी. 

Web Title: OMG: Boys expect these 7 things from Boyfriend!