​सर्वात जूनी आकाशगंगा सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 02:22 IST2016-03-05T09:21:18+5:302016-03-05T02:22:41+5:30

खगोलशास्त्रांच्या एका टीमने आतापर्यंत माहित असलेली सर्वात जूनी आकाशगंगा शोधून काढली आहे. 

The oldest galaxy is found | ​सर्वात जूनी आकाशगंगा सापडली

​सर्वात जूनी आकाशगंगा सापडली

ोलशास्त्रांच्या एका टीमने आतापर्यंत माहित असलेली सर्वात जूनी आकाशगंगा शोधून काढली आहे.

‘बिग बँग’च्या महास्फोटानंतर केवळ चाळीस कोटी वर्षांनंतर ही आकाशगंगा तयार झाली असून पृथ्वीपासून ती उर्सा मेजर नक्षत्राच्या दिशेने १३.४ प्रकाशवर्ष दूर अंतररावर आहे. ‘जीएन-झी११’ असे तिचे तात्पुरते नामकरण करण्यात आले आहे.

सुमारे दोन वर्षांपूर्वी हबल स्पेस टेलिस्कोपद्वारे सदूर अंतराळात सुर्यप्रकाशात केलेल्या शोधमोहिमेत सर्वप्रथम ही आकाशगंगा नजरेस पडली होती. त्यावेळीच खगोलशास्त्रज्ञांना अंदाज आला की, त्यांची हाती फार मोठे यश लागले आहे.

हबल टेलिस्कोपवर असणाऱ्या एका यंत्रामार्फत तिच्याकडून येणाºया प्रकाशाला विविध घटकलहरीमध्ये रुपांतरित केले असता तिचे अस्तित्त्व सिद्ध झाले.

Hubble

येल विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ पास्कल ओएस्च यांनी म्हटले की, एवढ्या सदूर अंतराळात असणाºया आकाशगंगेचे अंतर निश्चित करण्यासाठी हबलचा उपयोग होऊ शकतो ही आमच्यासाठी अंशत: आश्चर्याची गोष्ट आहे. आमच्या अपेक्षा मोठे यश आम्ही संपादन केले आहे. 

कॅलिफोर्निया विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ गॅर्थ लिंर्वोर्थ म्हणाले, आपले विश्वाचे वय आजच्या तुलनेत केवळ तीन टक्के असताना ही आकाशंगा निर्माण झाली होती. त्यामुळे तिचे फार विशेष महत्त्व आहे. यामुळे विश्वाच्या बालपणात डोकावणे शक्य झाले आहे.

Web Title: The oldest galaxy is found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.