ओबामांना वाय-फायची सुविधा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 08:45 IST2016-02-13T15:45:30+5:302016-02-13T08:45:30+5:30

जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि सर्व सुखे जिथे लोळण घेतात, अशा व्हाईट हाऊसमध्ये काही समस्या आहे

Obama does not have Wi-Fi facilities | ओबामांना वाय-फायची सुविधा नाही

ओबामांना वाय-फायची सुविधा नाही

ातील सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि सर्व सुखे जिथे लोळण घेतात, अशा व्हाईट हाऊसमध्ये काही समस्या आहे, असे सांगितल्यास कोणीही विश्वास ठेवणार नाही. त्यातही व्हाईट हाऊसमधील प्रमुख असलेले अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनाही काही समस्या आहे, असे सांगितल्यास कुणीही हे अशक्य आहे, असेच म्हणेल. 
जगातील सर्वांत शक्तिमान पुरुष आणि अमेरिकेचे प्रथम नागरिक असलेल्या व्यक्तीसाठी तेथील प्रशासन सर्व लेटेस्ट टेक्नॉलॉजी उपलब्ध करून देते. असे असतानाही ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल हे दोघेही व्हाईट हाऊसमधील वाय-फाय सेवेबाबत समाधानी नाहीत. याला कारणही तसेच आहे. व्हाईट हाऊसमध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजी उपलब्ध करून दिली आहे. मात्र काही ठिकाणी सुरक्षेच्या कारणामुळे सर्व सेवा बंद ठेवाव्या लागतात. यामुळे काही ठिकाणी वाय-फाय उपलब्ध होते तर काही ठिकाणी ते वापरणे अशक्य होत असल्याने बराक ओबामा यांना मोबाईल एक्सेस मिळत नाही. जगातील सर्वांत शक्तीशाली नेत्याच्या सुरक्षेलाही सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याने सर्व ठिकाणी वाय-फाय सेवा दिल्या जाऊ शकत नाहीत, असे व्हाईट हाऊसचे सुरक्षा अधिकारी दबक्या आवाजात सांगतात. 

Web Title: Obama does not have Wi-Fi facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.