अबब!! ३५०० विद्यार्थी बसतील एवढा भव्यदिव्य वर्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 21:45 IST2016-07-21T16:12:51+5:302016-07-21T21:45:06+5:30
साडे तीन हजार विद्यार्थी अगदी आरामशीर बसू शकतील एवढा भव्यदिव्य वर्ग चीनमध्ये आहे.

अबब!! ३५०० विद्यार्थी बसतील एवढा भव्यदिव्य वर्ग
भ रतातील शाळांमधील वर्गात बसणाऱ्या विद्यार्थीसंख्येवर नेहमीच नाव ठेवले जाते. पण जर एकाच वर्गात साडे तीन हजार विद्यार्थी एकत्र बसून शिकत असतील तर तुम्ही काय म्हणाल?
आता एवढे विद्यार्थी एकाच वर्गात बसणार म्हणजे किती दाटीवाटी करावे लागेल याचा विचार तुमच्या मनात सुरू असेल तर तो थांबवा. कारण साडे तीन हजार विद्यार्थी अगदी आरामशीर बसू शकतील एवढा भव्यदिव्य वर्ग चीनमध्ये आहे.
![China Hall]()
चीनच्या शँडाँग प्रांतातील जिनान शहरात हा विशाल हॉल आहे. चीनमधील अग्रणी व नावाजलेल्या विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची तयारी करण्यासाठी सुमारे सोडतीन हजार विद्यार्थी एकाच वेळेस या हॉलमध्ये फिजिक्स विषयाची शिकवणी घेतानाचे विहंगम फोटोज् सध्या खूप व्हायरल होत आहेत.
![China Hall]()
एखाद्या नाट्यगृहाप्रमाणे हा हॉल आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षी ही परीक्षा डिसेंबर महिन्यात घेण्यात येते.
एका वेबसाईटनुसार यावर्षी चीनमध्ये ७६ लाख कॉलेज पदवीधर असणार आहेत. आतापर्यंतची ही सर्वाधिक पदवीधरसंख्या आहे. परंतु वर्षांच्या पहिल्या तिमाहीत रोजगार उपलब्धता केवळ चार टक्क्यांनी वाढली आहे. स्थानिक रोजगार संशोधन संस्थेच्या माहितीनुसार चीनमध्ये वित्त आणि इंटरनेटशी निगडित क्षेत्रात अधिक रोजगार संधी उपलब्ध आहेत.