​युरोपमध्ये आता थेट बिअर पाईपलाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 16:34 IST2016-06-07T11:04:15+5:302016-06-07T16:34:15+5:30

शहरातून रस्त्याच्या बाजूने थेट बिअर पाईपलाईन टाकण्याची कल्पना त्यांनी सत्यात उतरवली.

Now live beer pipeline in Europe | ​युरोपमध्ये आता थेट बिअर पाईपलाईन

​युरोपमध्ये आता थेट बिअर पाईपलाईन

ापर्यंत तुम्ही गॅस, पाणी आणि तेलाची पाईपलाईन पाहिली असेल. मात्र,  युरोपमधील एका शहरात थेट बिअरची पाईपलाईन आहे. बेल्जियम देशातील ब्रुग्ज हे ऐतिहासिक शहर आहे.

रस्ते अतियश छोटे असल्यामुळे तेथील एका बिअर कंपनीला खूप त्रास सहन करावा लागत होता.

ट्रॅफिकमध्ये ट्रक अडकून राहायचे, डिलिव्हरीला उशिर व्हायचा, असे व्यावसायिक नुकसान होताना पाहून कंपनीने एक अजबच निर्णय घेतला.

शहरातून रस्त्याच्या बाजूने थेट बिअर पाईपलाईन टाकण्याची कल्पना त्यांनी सत्यात उतरवली. बिअर जिथे बनते तेथून सुमारे तीन किमी दूर अंतरावर बॉटलमध्ये ती पॅक केली जाते.

कारखाना ते पॅकेजिंग सेंटर अशी तीन किमी लांब पाईपलाईन त्यांनी सुरू केली. यामधून तासाला 3785 लिटर बिअर वाहते. यासाठी त्यांना 4.5 मिलियन डॉलर्स (30 कोटी रु.) खर्च आला. 

कंपनीच्या प्रमुखाने माहिती दिली की, ही पाईपलाईन टाकण्यापूर्वी शास्त्रीयपद्धतीने ऐतिहासिक शहराच्या आराखड्याचा अभ्यास करण्यात आला. कित्येक शतके पुरातन इमारतींना कोणतेही हानी पोहचणार नाही याची काळजी घेऊनच हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यात आला.

Web Title: Now live beer pipeline in Europe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.