आता लवकरच ट्विटरवर ‘जीआयएफ’ बटण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 09:24 IST2016-02-06T03:54:41+5:302016-02-06T09:24:41+5:30
ट्विटरदेखील आता युजर्सना ‘जीआयएफ’ इमेजेस पोस्ट करण्यासाठी

आता लवकरच ट्विटरवर ‘जीआयएफ’ बटण
स शल मीडियाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येक वेबसाईट ग्राहकांना आकर्षित करण्याचा, काही तरी वेगळे देण्याचा प्रयत्न करत असतात. ट्विटरदेखील आता युजर्सना ‘जीआयएफ’ इमेजेस पोस्ट करण्यासाठी स्वतंत्र ‘जीआयएफ’ बटण देण्याचा विचार करत आहे. इंटरनेटवर जीआयएफ इमेजसचा वाढता वापर पाहता कंपनीने ‘जीआयएफ’ बटणासंबंधी चाचणी सुरू केली असून लवकरच सर्व यूजर्सला ही सुविधा उपलब्ध होणार असल्याची टेक्नो जगतात चर्चा आहे.
काही निवडक ग्राहकांना ‘जीआयएफ’ बटणाची प्रायोगित तत्वावर सुविधा देण्यात आली असून यूजर अनुभवांवरून यामध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहे. फिल पर्लमन या यूजरने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या ट्विटर अकांऊ टवर ‘जीआयएफ’ बटण असून त्यावर क्लिक केल्यावर आगोदरच तयार केलेले अनेक जीआयएफ इमेजेस दिसतात. मुडनुसारही जीआयएफची निवड केली जाऊ शकते. कंपनीच्या या प्रयोगाला लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय.
यापूर्वी फेसबुक आणि याहूने ‘जिफी’ व ‘टम्ब्लर’शी मिळून त्यांच्या मेसेज सर्व्हिसमध्ये ‘जीआयएफ’चा वापर सुरू केला होता. ट्विटरकडून अद्याप याविषयी कोणतेही अधिकृत माहिती देण्यात जरी आली नसली तरी लवकरच कंपनी घोषणा करेल अशी अपेक्षा आहे.