‘सैराट’ मधील आर्चीचं नववीतील मार्कशिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 21:43 IST2016-05-05T16:13:37+5:302016-05-05T21:43:37+5:30
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर शिक्कामोतर्ब केलेल्या ‘सैराट’ फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरुने खाजगी आयुष्यातही कौतुकास्पद कामगिरी केली आहे
.jpg)
‘सैराट’ मधील आर्चीचं नववीतील मार्कशिट
र ष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर शिक्कामोतर्ब केलेल्या ‘सैराट’ फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरुने खाजगी आयुष्यातही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. रिंकूने नववीमध्ये तब्बल ८१.०६ टक्के गुण मिळविले आहेत. रिंकू अर्थात पे्रेरणा महादेव राजगुरूने मार्क शिट आपल्या फेसबुकच्या पेजवर शेअर केले असून ती शाळेच्या युनिफॉर्म मध्ये दिसत आहे.
![]()
रिंकूने ‘सैराट’ सिनेमातील अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेतच, पण तब्बल ८१ टक्के गुण मिळवून शिक्षणातही आपण सुसाट असल्याचे तिने दाखवून दिले आहे. रिंकू राजगूरूचा नुकताच निकाल जाहीर झाला असुन ती अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशालामध्ये शिक्षण घेत आहे. रिंकूसाठी हे वर्ष नक्कीच लकी ठरले आहे. सैराटमधील अभिनयानंतर राष्टÑीय पुरस्कार, आताची बॉक्स आॅफिसवरील कामगिरी आणि शिक्षणामध्येही अव्वल येऊन रिंकूने चाहत्यांवर छाप सोडली आहे.