​नवजात शिशु पालकांना कॉपी करत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 15:53 IST2016-05-08T10:23:57+5:302016-05-08T15:53:57+5:30

नवजात बालकांचे पहिल्या दोन महिन्यांपर्यंत अभ्यास केला. तेव्हा असे दिसून आले की, लहान बाळ आपले अनुकरण करत नाही.

Newborn is not copying the parent | ​नवजात शिशु पालकांना कॉपी करत नाही

​नवजात शिशु पालकांना कॉपी करत नाही

मन समजूत अशी आहे की, लहान बाळ आपले एक्सप्रेशन, चेहऱ्यावरील भाव, हालचाल, आवाजाची नक्कल करून शिकत असते. पण नव्या रिसर्चने हा समज खोटा ठरविला आहे.

आॅस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठाच्या संशोधकांनी नवजात बालकांचे पहिल्या दोन महिन्यांपर्यंत अभ्यास केला. तेव्हा असे दिसून आले की, लहान बाळ आपले अनुकरण करत नाही.

प्रमुख संशोधक व्हर्जिनिया स्लॉटर म्हणातात, ऐंशी आणि नव्वदच्या दशकात झालेल्या अध्यायनातही बाळ अनुकरण करण्याचा पुरावा नाही. पण काही कारणास्तव हा गैरसमज फार कॉमन आहे.

हा गैरसमज केवळ सामान्य लोकांतच नाही तर, मानसशास्त्र, न्युरोसायन्स आणि बालरोगचिकित्सा या क्षेत्रातील तज्ज्ञांमध्येदेखील तो आढळून आला. तोच दूर करण्यासाठी आम्ही हे संशोधन केल्याची माहिती प्रा. स्लॉटर यांनी दिली.

बाळामध्ये जन्मत:च अनुकरण करण्याची क्षमता नसते. सुरूवातीच्या काही महिन्यांनंतर ती त्याच्यामध्ये विकसित होते. मग असे असताना हा गैरसमज पसरला कसा?

या प्रश्नाचे उत्तर प्रा. स्लॉटर देतात की, यापूर्वी झालेल्या काही अध्यायनांमध्ये नवजात शिशु निवडक हातवारे व चेहऱ्यावरील हावभाव अनुकरण करण्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले होते. त्यामुळे कदाचित यामुळेच तो पसरला असावा.

Web Title: Newborn is not copying the parent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.