​तरुणाईचा नवीन म्युझिक फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2016 20:39 IST2016-04-21T15:09:25+5:302016-04-21T20:39:25+5:30

कामाच्या व्यापातून वेळात वेळ काढून तो बँडसह विविध कॉन्सर्टमध्ये सादरीकरण करत असतो.

The new music fund for youth | ​तरुणाईचा नवीन म्युझिक फंडा

​तरुणाईचा नवीन म्युझिक फंडा

र्पोरेट कल्चरमध्ये कामाचे किती प्रेशर असते हे तर सर्वांनाचा माहित आहे. प्रोजेक्ट, डेडलाईन, क्लार्इंट सॅटिस्फॅक्शन अशा सगळ्या गर्तेत स्वत:चे छंद जोपासणे दुरापस्त होऊन जाते. पण आजचे मल्टीफं क्शन यंगस्टर्स काम आणि आवड याचा मेळ कसा घालायचा हे चांगले जाणते.

आता जिष्णू दासगुप्ताचेच उदाहरण घ्या ना. जिष्णू पेशाने एका अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये एक्झिक्युटिव्ह आहे आणि ‘स्वरात्मा’ नावाच्या  रॉक बँडमध्ये बेस प्लेयरदेखील आहे. कामाच्या व्यापातून वेळात वेळ काढून तो बँडसह विविध कॉन्सर्टमध्ये सादरीकरण करत असतो. तो म्हणतो की, संगीतामुळे माझी क्रिएटिव्हीटी आणखी उजळून निघते.

आठवड्यातून किमान 15 तास तो बँडसाठी देतो. तो म्हणतो, काम तर सर्वांनाच करावे लागते. परंतु संगीतामुळे माझा कामाकडे पाहण्याचा दृष्टीकोन एकदम वेगळा बनतो. आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभव गीत-संगीत व्यक्त करणे आणि बँडमधील ऊर्जा कामात लावणे अशी सांगड मी घालतो.

स्नॅपडीलचे डिझाईन विभागाचे उपाध्यक्ष सिवरामाकृष्णन ‘अगम’ बँडमध्ये गायक आहे. तो म्हणतो कामाचा तणाव कमी करण्याचे संगीत सर्वोत्कृष्ट माध्यम आहे. आवड जोपासली तर कामाचा दर्जादेखील उंचावतो. अनेकदा मी आॅफिसमध्येसुद्धा परफॉर्म करतो. त्यामुळे आॅफिसमधील वातावरण एकदम खेळीमेळीचे राहते.

Web Title: The new music fund for youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.