​मॉडर्न आर्टच्या नावाने...कुछ भी करेगा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 15:26 IST2016-05-29T09:56:17+5:302016-05-29T15:26:17+5:30

टीजे खयातन (17) आणि केविन न्गुएन (16) या दोन खोडकर मुलांनी त्या संग्राहलयात फरशीवर त्यांचा चष्मा ठेवला.

By the name of Modern Art ... anything will! | ​मॉडर्न आर्टच्या नावाने...कुछ भी करेगा!

​मॉडर्न आर्टच्या नावाने...कुछ भी करेगा!

कलाक्षेत्रातील ज्यांना चुटूकशीही माहिती जरी नसेल त्यांनीसुद्धा ‘मॉडर्न आर्ट’ हे नाव नक्कीच ऐकले असेल.

मॉडर्न आर्ट हा कलाप्रकार सामान्या लोकांना नेहमीच बुचकाळ्यात पाडतो. जी कलावस्तू आपल्याला कळाली नाही ती ‘मॉडर्न आर्ट’ अशी त्यांची समजूत.

बरं अतिउत्साही सो कॉल्ड कलाप्रेमी/रसिक याहून वेगळे असतात असे नाही. साध्या दोन पोरांनी अशा कलाप्रेमींना वेड्यात काढले.

सॅन फ्रान्सिस्को म्युझियम आॅफ मॉडर्न आर्टमध्ये घटलेली घटना याचे ठळक उदाहरण आहे. त्याचे झाले असे की, टीजे खयातन (17) आणि केविन न्गुएन (16) या दोन खोडकर मुलांनी त्या संग्राहलयात फरशीवर त्यांचा चष्मा ठेवला.

म्युझियमला भेट देणाऱ्या ‘कलाप्रेमींना’ तो चष्मा म्हणजे काही तरी पोस्टमॉडर्न मास्टरपीस आहे असे वाटले. त्या चष्म्यपाशी गर्दी घुटमळू लागली, लोक त्याचे फोटो काढू लागले.

खयातने या सर्व प्रकाराचे फोटो ट्विट केल्यावर त्याला आतापर्यंत 61 हजारांपेक्षा जास्त रिट्विट्स आणि 64.8 हजार लाईक्स मिळाले आहेत.  तो म्हणतो, संग्राहलयात ठेवलेल्या कोणत्याही गोष्टीला लोक ‘कला’ समजतात हे पाहण्यासाठी त्याने हा प्रँक केला. हा सर्व प्रकार कळाल्यावर चष्म्याला ‘आर्टवर्क’ समजाणाऱ्या तथाकथित कलारसिकांना हसावे की रडावे हेच कळत नसेल. वाह रे वाह! मॉडर्न आर्ट.
{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: By the name of Modern Art ... anything will!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.