माझ्या पतीने प्रकल्प उभारले; मी शाळा उभारली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:30 IST2016-01-16T01:20:11+5:302016-02-07T14:30:19+5:30

मी एकदा पुरात वाहून गेलेल्या वस्तीतील मुलांमध्ये बसले आणि त्यांना विचारले की तुम्हाला तुमच्या नव्या...

My husband started the project; I built the school! | माझ्या पतीने प्रकल्प उभारले; मी शाळा उभारली!

माझ्या पतीने प्रकल्प उभारले; मी शाळा उभारली!

एकदा पुरात वाहून गेलेल्या वस्तीतील मुलांमध्ये बसले आणि त्यांना विचारले की तुम्हाला तुमच्या नव्या शाळेत काय हवे आहे? एक म्हणाला, फूटबॉल खेळायला मैदान हवे आहे. दुसरा म्हणाला, संगणक हवे. एक छोटी मुलगी जवळ आली आणि म्हणाली, मॅडम, जमलच तर मुलींसाठी वेगळे स्वच्छतागृह बांधा. हे ऐकून मला वाटले की, या छोट्या छोट्या गोष्टी भवितव्यातील शिक्षणाच्या दृष्टीने किती मोठी भूमिका बजावू शकतात आणि मी शाळा उभारण्याच्या कामाला लागले. माझे पती उद्योग उभारून लोकांना रोजगार देत असताना मी त्या रोजगारासाठी सक्षम मनुष्यबळ तयार करणार्‍या शाळा उभारतेय याचे मला प्रचंड समाधान आहे, अशा शब्दात नीता अंबानी यांनी त्यांच्या विकासात्मक उपक्रमांची माहिती दिली.
रिलायन्स फाउंडेशन या संस्थेच्या नीता अंबानी या संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. ही संस्था भारतभर विविध समाजोपयोगी आणि विकासाचे विविध उपक्रम राबवीत असते, तसेच त्यासाठी निधी उपलब्ध करीत असते. रिलायन्स इंडस्ट्रीज्चे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि सर्वांत श्रीमंत भारतीय असलेले मुकेश अंबानी यांच्या नीता या पत्नी आहेत. २0१४-२0१५ मध्ये रिलायन्स फाऊंडेशनने ७00 कोटी रुपये अशा विविध उपक्रमांवर खर्च केले. यापैकी बराचसा निधी ग्रामीण भागांत खर्च केला. शिक्षण हे या संस्थेचे पहिले लक्ष्य आहे. ग्रामीण आणि शहरी भारताला जोडण्यासाठी भारत इंडिया जोडो या प्रकल्पाद्वारेही विकासाचे त्यांचे काम जोरात सुरू आहे. या अंतर्गत कलेलाही प्रोत्साहन दिले जाते. शिकागो येथील कला संस्थेतर्फे आयोजित ' गेटस् ऑफ द लॉर्ड' या कला प्रदर्शनाची ही संस्था मुख्य प्रायोजक होती. यात कृष्णाशी संबंधित विविध चित्राकृतींचा समावेश होता. अशा प्रकारचे हे अमेरिकेतील पहिले प्रदर्शन होते. पिचवी कलेचे हे प्रदर्शन होते. या प्रसंगी त्यांच्याशी साधलेला संवाद.
प्रश्न : नीताजी, या कलाप्रदर्शनात फेरफेटका मारल्यावर तुम्हाला कसे वाटले?
नीता : विदेशात आमच्या संस्थेतर्फे एखादे कला प्रदर्शन आयोजित करण्याची आमची ही पहिलीच वेळ आहे. लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून मन प्रसन्न झाले. भारतीय पारंपरिक कलेचे हे रुप पाहून अनेकजण विस्मयचकित झाले. हे बघून मी भारावले.
प्रश्न : तुम्ही या कलेशी खूपच परिचित आहात आणि तुम्ही श्रीनाथजी यांचे अनुयायी आहात.. होय ना?
नीता : होय, आमचे कुटुंब श्रीनाथजी यांचे अनुयायी आहोत. शिकागोच्या कलासंस्थेचे प्रमुख डगलस ड्रइग आणि भारतीय, दक्षिण-पूर्व आशियाई, हिमालयीन आणि इस्लामिक कला संस्थेचे सहप्रमुख मधुवंती घोष माझ्याकडे आले अणि माझ्याशी चर्चा केली. यामुळे माझी यात रूची वाढत गेली. याचे कारण म्हणजे भारतीय कलेचे विदेशात प्रदर्शन भरविण्याची ही एक संधी होती.
प्रश्न : फाऊंडेशनच्या इतर घडामोडींविषयी सांगा. यात तुम्ही कोणत्या उपक्रमाशी जास्त जोडल्या गेल्या आहात?
नीता : शिक्षण!
प्रश्न : तुम्ही मुंबईत शाळा सुरू केली आहे?
नीता : विवाहानंतर मुंबईत मी पहिली नोकरी केली ती शिक्षिकेची होती. आता आम्ही १३ शाळा चालवितो. आम्ही १५ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहोत.
आम्ही बारा वर्षांआधी धिरुभाई अंबानी इंटरटरनॅशनल स्कूलची स्थापना केली होती. तर शिक्षण ही माझ्या अगदी हृदयाजवळची गोष्ट आहे. कलाप्रदर्शनाच्या उद््घाटनप्रसंगी मी शिक्षणाविषयीच बोलले. उत्तराखंडमध्ये पूर आला तेव्हा आम्ही मदतकार्य केले. शाळा आणि घरांच्या उभारणीत आम्ही मदत केली. उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील मुलांसोबत मी काही काळ घालवला.

Web Title: My husband started the project; I built the school!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.