किमान १ मिलिअन व्ह्युज हवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 19:14 IST2016-05-17T13:44:02+5:302016-05-17T19:14:02+5:30

‘कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण’ या पहिल्या मराठी वेब शो च्या पहिल्या भागात अभिनेत्री राधिका आपटे होती तर दुस-या भागात श्रिया पिळगावकर होती

Must have at least 1 million views | किमान १ मिलिअन व्ह्युज हवे

किमान १ मिलिअन व्ह्युज हवे

ास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण’ या पहिल्या मराठी वेब शो च्या पहिल्या भागात अभिनेत्री राधिका आपटे होती तर दुस-या भागात श्रिया पिळगावकर होती. आता लवकरच प्रदर्शित होणा-या तिस-या भागात कोण असणार याची उत्सुकता तर सगळ्यांनाच आहे.  पण काही दिवसांपूर्वी  तिस-या  भागासाठी कोणाला मत द्याल असा प्रश्न विचारण्यात आला होता.  त्यावेळी दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतील मिनल, एना आणि रेश्मा ऊर्फ स्वानंदी टिकेकर, पूजा ठोंबरे आणि सखी गोखले या तिघांपैकी एकाची कास्टिंग काऊच साठी निवड करायची होती.  पण आता ट्रिपल धमाका प्रेक्षकांना मिळाला आहे. याचाच अर्थ असा होतो ना राव की आपल्या माजघरातल्या तिन्हीही राणी या वेब शो मध्ये येणार आहे. 

या तिन्हीही अभिनेत्री या वेब शो मध्ये सामील होणार आहेत म्हणून तर अमेय आणि निपुण म्हणतात ना, “३ पोरी आणल्या आहेत.  किमान १ मिलिअन व्ह्युज हवे.”

लवकरच हा शो प्रदर्शित होणार आहे आणि याची तारीख कळेलच तुम्हांला. बघूयात अमेय आणि निपुण आता या तिघांची कशी धमाल उडवतात ते.  अमेय आणि निपुणने मस्ती केल्यावर मिनलसारखी स्वानंदी वाट तर नाही ना लावणार यांची आणि जर एनासारखं पूजाला त्यांचे जोक्स समजलेच नाही तर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेश्मासारखी सखी रडू तर लागणार नाही ना?
कळतय...कळतय... खूप प्रश्न असतील ना आणि खूप एक्साईट असाल ना या तिघींना एकत्र पाहायला.  काळजी नसावी. अमेय आणि निपुण पण वाट बघत असतील त्यांना छळायची.  कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण शो चा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Must have at least 1 million views

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.