​मर्डोकच्या पूर्व पत्नीचे पुतीनशी अफेयर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 21:36 IST2016-04-02T04:36:45+5:302016-04-01T21:36:45+5:30

वेंडी डेंग (47) आणि रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादमिर पुतीन यांचे अफेयर सुरू आहे, अशा आशयाचा बातम्या सध्या प्रचंड गाजत आहेत.

Murdoch's former wife's Putinashi affair? | ​मर्डोकच्या पूर्व पत्नीचे पुतीनशी अफेयर?

​मर्डोकच्या पूर्व पत्नीचे पुतीनशी अफेयर?

गतिक मीडियाचा अनभिषक्त सम्राट रुपर्ट मर्डोक ची पूर्व पत्नी वेंडी डेंग (47) आणि रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादमिर पुतीन यांचे अफेयर सुरू आहे, अशा आशयाचा बातम्या सध्या प्रचंड गाजत आहेत.

पाश्चात्य मीडियानुसार, नुकतेच डेंगला चेल्सी एफसी फुटबॉल संघाचा मालक रोमन अब्रामोविचच्या यॉटवर पाहण्यात आले. अब्रामोविच हा पुतीन आणि डेंगचा कॉमन मित्र आहे.

रुपर्टने तीने आठवड्यांपूर्वी जेरी हॉलशी (59) विवाह केला. डेंग आणि पुतीनच्या अफेयरच्या बातम्या तसे पाहिले गेले तर नवीन नाहीत. 14 वर्षांच्या संसारनंतर तीन वर्षांपूर्वी जेव्हा तिचा रुपर्टशी घटस्फोट झाला तेव्हापासूनच पुतीन आणि डेंग लपूनछपून एकमेकांना डेट करत आहेत, अशी अफवा पसरली होती. कारण त्याच्या पुढच्याच वर्षी पुतीन यांनी पत्नी ल्युडमिलासोबतचा 30 वर्षांचा संसार मोडला होता.

अमेरिकेच्या एका मॅगझीनला निनावी व्यक्तीने माहिती देताना सांगितले की, जेव्हा रुपर्ट आणि जेरीच्या अफेयरची गोष्ट समोर आली होती. तेव्हादेखील कोणीच विश्वास ठेवत नव्हते. पण बघा आता! दोघांनी एकमेकांशी लग्न केले. त्यामुळे डेंग आणि पुतीन यांच्याबाबतही काही सांगता येत नाही.

डेंगला ग्रेस (15) आणि क्लोई (13) या दोन मुली असून पुतीनदेखील दोन मुलींचे पिता आहेत. 32 वर्षीय जिम्नॅस्ट अलिना कबेयवाशी देखील मध्यंतरी त्यांचे सूत जुळले होते. यापूर्वी डेंग आणि इंग्लंडचे पंतप्रधान टोनी ब्लेयर यांच्यादेखील अफेयरची अफवा उठली होती. मात्र, दोघांनी याला वेळोवेळी नकार दिला.

Web Title: Murdoch's former wife's Putinashi affair?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.