मुलायमसिंग यांच्या घरी होणार आणखी एका सूनेचा गृहप्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 06:22 IST2016-03-06T13:22:35+5:302016-03-06T06:22:35+5:30
समाजवादी पक्षाचे सुप्रीमो मुलायमसिंह यादव यांच्या घरी आणखी एका सूनेचा गृहप्रवेश होणार आहे. येत्या १० मार्चला मुलायम यांचे बंधू शिवपालसिंह यादव यांचे चिरंजीव आदित्य याचा विवाह होत आहे.

मुलायमसिंग यांच्या घरी होणार आणखी एका सूनेचा गृहप्रवेश
स ाजवादी पक्षाचे सुप्रीमो मुलायमसिंह यादव यांच्या घरी आणखी एका सूनेचा गृहप्रवेश होणार आहे. येत्या १० मार्चला मुलायम यांचे बंधू शिवपालसिंह यादव यांचे चिरंजीव आदित्य याचा विवाह होत आहे. सैफई येथे हा भव्यदिव्य विवाहसोहळा पार पडणार आहे. कंस्ट्रक्शन व्यवसाय असलेले संजय सिंह यांची कन्या राजलक्ष्मी हिच्यासोबत आदित्य विवाहबद्ध होत आहेत.१७ फेबु्रवारीला आदित्य व राजलक्ष्मी यांचा साखरपुडा झाला होता. येत्या १३ तारखेला लखनौ जनेश्वर मिश्र पार्कमध्ये स्वागत सोहळा होणार आहे.