मातृदिनानिमित्त मराठी कलाकारांच्या आईविषयी भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 21:34 IST2016-05-08T16:02:00+5:302016-05-08T21:34:27+5:30

ठेच लागल्यास सर्वात पहिले येणारा आवाज म्हणजे “आई गं! ” आई म्हणजे आपल्या सर्वांना जवळची वाटणारी व्यक्ती आणि हक्काची मैत्रीण होय.

Mother goddess emotions about the mother of Marathi artists | मातृदिनानिमित्त मराठी कलाकारांच्या आईविषयी भावना

मातृदिनानिमित्त मराठी कलाकारांच्या आईविषयी भावना

च लागल्यास सर्वात पहिले येणारा आवाज म्हणजे “आई गं! ”

आई म्हणजे आपल्या सर्वांना जवळची वाटणारी व्यक्ती आणि हक्काची मैत्रीण होय.  आपण सर्वजण आईचं महत्त्व जाणतोच पण आपण ते रोज व्यक्त करत नाही. परंतु आईसाठी खास करण्याची इच्छा तर सगळ्यांच्या मनात असते आणि ‘मातृदिनाच्या’ निमित्ताने आईविषयी प्रेम व्यक्त करण्याची संधी आपल्याला मिळते.  याच गोड संधीचा फायदा मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी देखील घेतला आहे. 

कोल्हापूरात सुरु असलेल्या मराठी सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीग म्हणजेच MBCL मध्ये सहभागी असलेल्या मराठी कलाकारांनी आईविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  जरी कलाकार MBCLच्या निमित्ताने घरापासून, आईपासून लांब असले तरी त्यांच्या आईविषयी भावना व्यक्त करुन मातृदिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

भावना व्यक्त करताना कलाकार सांगतात,

संगीतकार अजित परब म्हणाले, “प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं वरचं स्थान असतं. कलाकारांसाठी त्यांच्या करियरमध्ये आईचा जास्त पाठिंबा असतो.” तसेच आईसाठी त्यांनी ‘मैं कभी बतलाता नहीं...पर अंधेरे से डरता हूँ मैं माँ...’ हे गाणं समर्पित केलं. 

गायक मंगेश बोरगांवकरने ‘धन्य धन्य नारी जीवन...औरों को तू ही अर्पण... अपने लिए तू सोचे ना’ हे गाणं आईला समर्पित करुन “प्रत्येक मुलाचं आई म्हणजे सर्वस्व आहे” या शब्दांत आईविषयी भावना व्यक्त केली.

अभिनेता हरिष दुधाडे सांगतो की, “भावना हा शब्द जिथून सुरु होतो ते श्रध्दास्थान म्हणजे आई. आईविषयीच्या भावना शब्दांत मांडू शकत नाही. माझ्यातल्या आत्मविश्वास वाढवणारी माझी आई. आई ही साक्षात देव आहे.”

आईविषयी जेवढे बोलू तितके कमीच...तरी आईविषयी बोलताना शब्द कमी पडतात. कमालच आहे ना ‘आई-मुलाच्या नात्याची’!!

Web Title: Mother goddess emotions about the mother of Marathi artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.